पुणे, १३ मे २०२५: युपीएल स्पेशॅलिटी केमिकल्स लिमिटेड आता सुपरफॉर्म केमिस्ट्रीज लिमिटेड या नावाने ओळखली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. ही आता पूर्णपणे स्वतंत्र कंपनी म्हणून कार्यरत असून यूपीएल लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. सुपरफॉर्म हा ₹१०,००० कोटींचा (१.२ अब्ज अमेरिकन डॉलर्स) व्यवसाय असून, त्यात दरवर्षी ₹४००-५०० कोटींच्या दरम्यान गुंतवणूक केली जात आहे.
सुपरफॉर्म ही नेक्स्ट जनरेशन स्पेशालिटी रासायनिक कंपनी आहे, जी नावीन्यता, शाश्वतता आणि उच्च-कार्यक्षमता उपायांच्या आधारस्तंभांवर आपली ओळख निर्माण करत आहे. सुपरफॉर्म जगातील काही सर्वाधिक गतिमान आणि वैविध्यपूर्ण क्षेत्रांना सेवा पुरवते. यामध्ये शेती, ल्युब्रिकंट (स्नेहक), ज्वालारोधक, खाणकाम, आरोग्यसेवा, खाद्यपदार्थ आणि पेय उद्योगांचा समावेश आहे.
भारत आज रासायनिक उद्योगात एक प्रमुख जागतिक खेळाडू बनण्याच्या उंबरठ्यावर आहे. विशेषज्ञांच्या अंदाजानुसार, २०४० पर्यंत भारतीय रासायनिक बाजारपेठ $८५०-$१,००० अब्ज डॉलर्सपर्यंत विस्तारू शकते. यामध्ये स्पेशॅलिटी केमिकल विभागाचा जागतिक बाजारपेठेत १०-१२% वाटा असण्याची शक्यता आहे. जागतिक रसायनशास्त्र बाजारपेठेतील भारताचा वाटा २०४० पर्यंत तिप्पट होण्याची अपेक्षा आहे, तसेच २०२७ ते २०४० दरम्यान वार्षिक ७-१०% वाढ अपेक्षित आहे.
सुपरफॉर्मचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची उत्पादन क्षमता नसून, क्लिष्ट रासायनिक प्रक्रियांमध्ये काम करण्याची आणि गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्याची क्षमता त्याला इतरांपासून वेगळे करते. कंपनीकडे प्रतिक्रिया क्षमतांचा एक विस्तृत पोर्टफोलिओ आहे, ज्यापैकी बहुतेक मागणीनुसार तयार केले जाऊ शकतात. सुपरफॉर्म ग्रीन केमिस्ट्री आणि शाश्वत उपायांच्या वाढत्या जागतिक मागणीशी जुळवून घेत असून, याद्वारे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तिची स्थिती मजबूत होत आहे.
सीईओ श्री. राज तिवारी यांच्या नेतृत्वाखाली आणि ३,५०० हून अधिक व्यावसायिकांच्या टीमसह सुपरफॉर्म "तंत्रज्ञानाच्या विकासासाठी आणि नवोपक्रमासाठी आदर्श बनणे" या यूपीएल ग्रुपच्या व्यापक दृष्टिकोनाशी जोडलेली आहे. या माध्यमातून कंपनी जागतिक स्पेशॅलिटी केमिस्ट्रीज उद्योगाच्या भविष्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
------------------------------------------
#SuperformChemistries
#SpecialtyChemicals
#UPL
#ChemicalIndustry
#IndianManufacturing
#GreenChemistry
#CorporateRebranding
#BusinessNews
#ChemicalSector
#SustainableChemistry

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: