चिरनेर येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती सोहळा

 


उरण : उरण तालुक्यातील चिरनेर कातळपाडा येथे छावा प्रतिष्ठान चिरनेर, युद्धनौका ग्रुप आणि ग्रामस्थ मंडळ चिरनेर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दिनांक १४ मे २०२५ रोजी श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती आणि श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण रायगड जिल्ह्यात केवळ उरण तालुक्यात श्री छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावर्षी देखील ही जयंती विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.

कार्यक्रमानुसार, सकाळी ९ वाजता श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन लक्ष्मण केणी आणि ज्योती केणी यांच्या हस्ते होईल. सकाळी १० वाजता श्री छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म सोहळा साजरा केला जाईल, ज्यात कु. सुजाता गोंधळी यांचे पाळणागीत सादर होईल. सकाळी ११ वाजता माजी सैनिक सचिन कडू आणि अश्विनी कडू तसेच नितेश सिंग आणि मनीषा सिंग यांच्या शुभ हस्ते सत्यनारायणाची महापूजा होईल.

दुपारी ४ वाजता शिवबंधू प्रेमी, समस्त शिवभक्त, ग्रामस्थ मंडळ चिरनेर उरण आणि प. पु. हभप हसुराम बाबा केळवणे यांचे शिष्य हभप अनिल महाराज (वशेणी), हभप गणपत महाराज (सावरसई) व त्यांचे शिष्यगण यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य पालखी मिरवणूक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ७ ते ८ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा जयंती सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी छावा प्रतिष्ठान चिरनेर, युद्धनौका ग्रुप, ग्रामस्थ मंडळ चिरनेर कातळपाडा, दुर्गा माता नवरात्र उत्सव चिरनेर, नवतरुण मित्र मंडळ कातळपाडा, अध्यात्मिक पौर्णिमा मंडळ चिरनेर भोम, अंकुश इलेव्हन, अर्जुन इलेव्हन, नरेंद्र महाराज सांप्रदाय चिरनेर, अभिनव मित्र मंडळ, निखिल स्पोर्ट्स, मंजित स्पोर्ट्स, छावा ग्रुप, सह्याद्री प्रतिष्ठान, आकृती कलामंच चिरनेर, ओम साई संवाद मंडळ चिरनेर, संभा एक छावा ग्रुप भोम, विघ्नहर्ता मित्र मंडळ कातळपाडा आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था यांसारख्या विविध सामाजिक संस्था सहकार्य करणार आहेत.

आयोजकांनी सर्व शिवभक्तांना पालखी सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली अर्पण करण्याचे आणि दिवसभरातील विविध धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे नम्र आवाहन केले आहे.

.....................................................

#SambhajiMaharajJayanti

#Chirner

#Uran

#Raigad

#ShivJayanti

#SatyanaarayanPuja

चिरनेर येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती सोहळा चिरनेर येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती सोहळा Reviewed by ANN news network on ५/०८/२०२५ ०८:३१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".