मुंबई : भारतीय हवामान विभाग, मुंबई यांनी ०७ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता दिलेल्या ताज्या इशाऱ्यानुसार, पुढील ३ ते ४ तासांत ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या वादळात ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, पुन्हा पावसाची शक्यताही आहे.
नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना:
-
अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळा.
-
झाडांखाली, वीजेच्या खांबाजवळ किंवा उघड्यावर थांबू नका.
-
मोबाईल, टीव्ही, रेडिओ व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद ठेवा.
-
शेतकरी व मच्छीमार बांधवांनी विशेष काळजी घ्यावी.
..............................
#WeatherAlert
#IMDMumbai
#ThaneStorm
#PalgharRain
#RaigadWeather
#ThunderstormWarning
#MaharashtraRain
#MayWeatherUpdate
Reviewed by ANN news network
on
५/०७/२०२५ ०२:४५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: