ज्येष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांना स्व. अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार जाहीर!

 


मुंबई : पार्श्वगायन क्षेत्रातील आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ गायिका उत्तरा केळकर यांना यंदाचा स्व. अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार 2025 जाहीर करण्यात आला आहे. सुप्रसिद्ध अकॉर्डियन वादक, संगीत संयोजक आणि संगीतकार स्व. अरुण पौडवाल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारा हा पुरस्कार यंदा केळकर यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

हा सोहळा शनिवार, 10 मे 2025 रोजी संध्याकाळी 7 वाजता, खार (पश्चिम), मुंबई येथील पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांच्या निवासस्थानी त्यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम रुपये ५१,००० असे आहे. यंदा या पुरस्काराचे  २८वे वर्ष आहे.

याआधी सन्मानित झालेले काही मान्यवर:

जी. मल्लेश, राम कदम, यशवंत देव, प्रभाकर जोग, दत्ता डावजेकर, अशोक पत्की, श्यामराव कांबळे, जयसिंग भोई, प्रमोद साने, उल्हास बापट, जगदीश खेबुडकर, शांताराम नांदगावकर, वंदना विटणकर, अरुण दाते, रमेश अय्यर, सुनील कौशिक, डी. ओ. भन्साळी, अविनंदन टागोर, हेमंत पारकर, सत्येन पौडवाल, गिरीश संझगिरी, चंद्रशेखर महामुनी, मदन काजळे, त्यागराज खाडिलकर...


उत्तरा केळकर: एक गौरवशाली कारकीर्द

शिक्षण:

  • B.A. (अर्थशास्त्र)

  • शास्त्रीय संगीत डिप्लोमा – मुंबई विद्यापीठ

  • शास्त्रीय शिक्षण – पं. फिरोज दस्तूर (किराणा घराणे)

  • सुगम संगीताचे शिक्षण – यशवंत देव, श्रीकांत ठाकरे

गायन प्रवास:

  • ५३ वर्षांची गायन कारकीर्द

  • १२ भाषांमधून गायन

  • ४२५+ चित्रपटांसाठी पार्श्वगायन

  • ६५०+ ऑडिओ कॅसेट्स/सीडीज

  • जाहिराती, जिंगल्स, शॉर्ट फिल्म्समध्ये सहभाग

  • देश-विदेशात संगीत मैफिली

  • आत्मचरित्र: "उत्तर रंग"


उत्तरा केळकर यांची लोकप्रिय गीते:

  1. सत्यम शिवम सुंदरा – सुशीला

  2. अग नाच नाच राधे – गोंधळात गोंधळ

  3. झन झन नन छेडील्या तारा – हळदी कुंकू

  4. भन्नाट रानवारा – कशासाठी प्रेमासाठी

  5. मंदिरात अंतरात तोच – धाकटी सून

  6. गडद जांभळ भरलं आभाळ – एक होता विदूषक

  7. येशील येशील राणी – पोरींची कमाल बापाची धमाल

  8. कुणीतरी येणार येणार ग – अशी ही बनवा बनवी

  9. बहिणाबाई ची गाणी

  10. देवांचाही देव करितो – आई

  11. बिलन शी नागीन निघाली

  12. अशी चिक मोत्याची माळ

  13. चला जेजुरी ला जाऊ – नवरा माझा नवसाचा


प्राप्त पुरस्कार:

  • महाराष्ट्र राज्य शासनाचा सर्वोत्तम पार्श्वगायिका पुरस्कार – २ वेळा

  • मिया तानसेन पुरस्कार – सूर सिंगार संसद

  • उमेद पुरस्कार

  • कोकण रत्न पुरस्कार

  • महाराष्ट्र रत्न पुरस्कार

  • राम कदम पुरस्कार

  • महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार

  • ................................

  • #UttaraKelkar 

  • #ArunPaudwalAward2025 

  • #MarathiMusic 

  • #PlaybackSinger 

  • #AnuradhaPaudwal 

  • #MusicAward 

  • #MarathiGaurav 

  • #IndianMusicAwards 

  • #LegendarySinger 

  • #MarathiCinema



ज्येष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांना स्व. अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार जाहीर! ज्येष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांना स्व. अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार जाहीर! Reviewed by ANN news network on ५/०७/२०२५ ०२:२९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".