मुंबई, दि. ८ (दुपारी १ वाजता जारी): भारतीय हवामान विभागाने (आयएमडी), मुंबई यांनी आज दुपारी १ वाजता जारी केलेल्या तातडीच्या इशार्यानुसार, पुढील ३ ते ४ तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरे, पालघर, ठाणे, रायगड, नाशिक आणि धुळे जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची शक्यता आहे. या दरम्यान, वाऱ्याचा वेग ४० ते ५० किलोमीटर प्रतितास राहू शकतो.
हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ज्या नागरिकांना अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडावयाचे आहे, त्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. वादळी वाऱ्याच्या वेळी झाडांखाली किंवा असुरक्षित ठिकाणी आश्रय घेणे टाळावे. तसेच, विद्युत खांबांपासून दूर राहावे.
इशारा दिलेले जिल्हे:
- मुंबई
- पालघर
- ठाणे
- रायगड
- नाशिक
- धुळे
नागरिकांनी अधिक माहितीसाठी आणि अद्ययावत हवामान अंदाजासाठी आयएमडी मुंबईच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
..............................

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: