पुणे, दि. २८: रहाटणी परिसरात एका तरुणाला केवळ जमिनीच्या खरेदी दस्तामध्ये ओळख दाखवल्याच्या कारणावरून मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आली. आकाश रवींद्र भालेराव (वय ३३) यांनी याप्रकरणी किरण देवराम नखाते (वय ४५) यांच्या विरोधात काळेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास फिर्यादी आकाश भालेराव हे भालेराव कॉर्नर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, रहाटणी येथून पायी घरी जात होते. त्यावेळी आरोपी किरण नखाते याने त्यांना अडवले आणि त्यांच्या मित्र निखील विश्वनाथ नखाते याने मौजे रहाटणी येथील सर्व्हे नं. ५६ मधील ३१ गुंठे जमीन खरेदी करताना आकाश भालेराव यांनी खरेदी दस्तामध्ये ओळख का दाखवली, असा जाब विचारला.
या कारणावरून आरोपी किरण नखाते याने आकाश भालेराव यांना शिवीगाळ केली आणि हाताने मारहाण केली. तसेच, फिर्यादी आणि त्यांचा मित्र निखील नखाते यांनाही बघून घेण्याची धमकी दिली. याप्रकरणी काळेवाडी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १२६ ( २ ), ११५ (२), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक शंतनु नाईकनिंबाळकर पुढील तपास करत आहेत. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
--------------------------------------------------------------------------------------------------
#RahataniCrime #Assault #LandDispute #PuneCrime #PoliceInvestigation
Reviewed by ANN news network
on
५/२८/२०२५ ०४:५७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: