नाशिक : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षण अधिकारी आणि एका खाजगी व्यक्तीला रेशनकार्ड काढून देण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणात, तक्रारदाराने ६० रेशनकार्ड काढण्यासाठी पुरवठा निरीक्षण अधिकारी ललीत सुभाष पाटील (वय ४४) यांच्याशी संपर्क साधला होता.
तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ला.प्र.वि.), नाशिक कार्यालयात या घटनेची तक्रार दाखल केली.
यामुळे, १३ मे २०२५ रोजी इगतपुरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ (अ) आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-----------------------------
#Corruption
#Bribery
#Maharashtra
#Nashik
#Crime
Reviewed by ANN news network
on
५/१५/२०२५ ०४:४८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: