मुंबई: मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी कारवाई करत ६ कोटी १९ लाख ४८ हजार रुपये किमतीचा एमडी (मेफेड्रोन), गांजा आणि कोडेन फॉस्फेटयुक्त औषधे जप्त केली आहेत. या प्रकरणी सलमान इजहार शेख (वय २३) नावाच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथक परिमंडळ ६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मैत्रानंद खंदारे यांना माहिती मिळाली होती की, रजा चौक, कमलारमन नगर झोपडपट्टी, बैगणवाडी, गोवंडी येथे सलमान शेख आणि त्याचे साथीदार अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणावर विक्री करत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शेखच्या घरावर छापा टाकला.
छाप्यात ३ किलो ७८ ग्रॅम एमडी (किंमत ६ कोटी १५ लाख ६० हजार रुपये), १२ किलो गांजा (किंमत २ लाख ४० हजार रुपये), ३६ नग कोडेन फॉस्फेटयुक्त ओनोरेक्स बॉटल्स (किंमत १८ हजार रुपये) आणि १ लाख ३० हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली.
अंमली पदार्थ विरोधी पथक परिमंडळ ६ आणि शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.
---------------------------------
#Mumbai
#DrugSeizure
#Narcotics
#Crime
#Maharashtra
Reviewed by ANN news network
on
५/१५/२०२५ ०४:५४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: