पुणे, १४ मे २०२५ : किर्लोस्कर ऑईल इंजिन्स कंपनीने आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या चौथ्या तिमाहीत १,४०१ कोटी रुपयांची आतापर्यंतची सर्वाधिक (स्वतंत्र) त्रैमासिक विक्री नोंदवली आहे. कंपनीने आज जाहीर केलेल्या निकालानुसार, या तिमाहीत विक्रीमध्ये मागील तिमाहीच्या तुलनेत २१ टक्के वाढ झाली आहे, तर संपूर्ण आर्थिक वर्षात स्वतंत्र व्यवसायात ६ टक्के वार्षिक वाढ नोंदवण्यात आली आहे.
इंटर्नल कम्बश्चन इंजिन्स, शेतीची उपकरणे आणि जनरेटर सेट्सच्या निर्मितीत आघाडीवर असलेल्या किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लिमिटेड (केओईएल) (बीएसई: ५३३२९३; एनएसई: KIRLOSENG) ने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ४१६ कोटी रुपयांचा स्वतंत्र निव्वळ नफा मिळवला आहे. हा मागील वर्षीच्या तुलनेत १५ टक्के अधिक आहे.
"ही तिमाही आणि एकंदरीत आर्थिक वर्ष आमच्यासाठी खूपच चांगले ठरले. या चौथ्या तिमाहीत आम्ही १,४०१ कोटी रुपयांचा महसूल मिळविण्याची कामगिरी केली. कोयलची (केओईएल) ही आतापर्यंतची सर्वाधिक त्रैमासिक विक्री आहे. आम्ही १२.१ टक्के इतका मजबूत नफाही कमावला," असे कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका गौरी किर्लोस्कर यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या, "प्री-बाय आणि सीपीसीबी-फोर+ बदलानंतर मागणीतील तफावतीनंतरही, आमचा वार्षिक महसूल ६ टक्क्यांनी वाढून ५,०७३ कोटींवर पोहोचला. हा आमचा आतापर्यंतचा सर्वाधिक वार्षिक विक्रीचा आकडा आहे. मागील वर्षाच्या तुलनेत आमचे मार्जिन १११ बेसिस पॉइंट्सने वाढले. आमच्या बी-टू-बी आणि बी-टू-सी या दोन्ही व्यवसाय विभागांनी विक्री आणि नफा दोन्हीच्या दृष्टीने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली."
'२x३y' चा यशस्वी प्रवास
याच तिमाहीत कंपनीच्या '२x३y' (३ वर्षांत दुप्पट वाढीच्या) प्रवासाची समाप्ती झाली आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने आकार ३ वर्षांत दुप्पट करण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प जाहीर केला होता. "त्या दृष्टिकोनातून पाहता, आमचा महसूल १.६ पट वाढला, एबिटा २.४ पट वाढला आणि नियमित कामकाजातून मिळणाऱ्या रोख रकमेची वाढ २.६ पट झाली," असे गौरी किर्लोस्कर यांनी सांगितले.
"मागील ३ वर्षांत आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. सर्व काही नियोजनानुसार घडलेच असे नाही, पण आमच्या टीमने चपळता आणि चिकाटी दाखवत सलग तीन वर्षे उत्कृष्ट निकाल साधले. या तीन वर्षांत आम्ही एकत्रितपणे जे काही गाठले, त्याचा मला अभिमान आहे. या यशस्वी प्रवासामुळे आम्हाला पुढच्या टप्प्यातील आमच्या वाढीचा आत्मविश्वास मिळतो आहे," असेही त्या म्हणाल्या.
'२बी२बी' चे पुढील लक्ष्य
कंपनीने आता '२बी२बी' म्हणजे पुढील ५ वर्षांत कंपनीला २ अब्ज डॉलरच्या स्तरावर नेण्याचे धोरण आखले आहे. याबाबत गौरी किर्लोस्कर यांनी आत्मविश्वास व्यक्त केला आहे.
३२५ टक्के लाभांशाची शिफारस
कंपनीच्या संचालक मंडळाने आर्थिक वर्षासाठी एकूण ३२५ टक्के लाभांश देण्याची शिफारस केली आहे. यामध्ये २०० टक्के अंतिम लाभांश (रु. ४.०० प्रति शेअर) समाविष्ट आहे, ज्यास शेअरधारकांची मंजुरी आवश्यक आहे. याआधी १२५ टक्के अंतरिम लाभांश (रु. २.५० प्रति शेअर) दिला गेला होता.
आर्थिक वर्ष २०२४-२५ चे निकाल
स्वतंत्र आर्थिक कामगिरी:
- निव्वळ विक्री: ५,०७३ कोटी रु. (मागील वर्षी ४,८०६ कोटी रु.). विक्रीत ६ टक्के वार्षिक वाढ.
- एबिटा: ६५४ कोटी रु. (मागील वर्षी ५६७ कोटी रु.). एबिटामध्ये १५ टक्के वाढ.
- एबिटा मार्जिन: १२.८ टक्के (मागील वर्षी ११.७ टक्के)
- निव्वळ नफा: ४१६ कोटी रु. (मागील वर्षी ३६२ कोटी रु.). नफ्यात १५ टक्के वाढ.
- रोख व समकक्ष निधी (कर्ज वगळून): ४४८ कोटी रु.
एकत्रित कामगिरी:
- नियमित कामकाजातून महसूल: ६,३४९ कोटी रु. (मागील वर्षी ५,८९८ कोटी रु.). महसुलात ८ टक्के वाढ.
- निव्वळ नफा: ४४९ कोटी रु. (मागील वर्षी ४५१ कोटी रु.). नफ्यात ०.४ टक्के घट.
चौथ्या तिमाहीचे निकाल (स्वतंत्र):
- निव्वळ विक्री: १,४०१ कोटी रु. (मागील वर्षी १,३७८ कोटी रु.). विक्रीमध्ये २ टक्के वार्षिक वाढ, २१ टक्के त्रैमासिक वाढ.
- एबिटा: १७१ कोटी रु. (मागील वर्षी १७९ कोटी रु.). एबिटामध्ये ५ टक्के वार्षिक घट, ४५ टक्के त्रैमासिक वाढ.
- एबिटा मार्जिन: १२.१ टक्के (मागील वर्षी १२.८ टक्के)
- निव्वळ नफा: १०६ कोटी रु. (मागील वर्षी ११८ कोटी रु.). नफ्यात १० टक्के वार्षिक घट, ६२ टक्के त्रैमासिक वाढ
चौथ्या तिमाहीचे निकाल (एकत्रित):
- नियमित कामकाजातून महसूल: १,७५३ कोटी रु. (मागील वर्षी १,६६० कोटी रु.). महसुलात ६ टक्के वार्षिक वाढ, २१ टक्के त्रैमासिक वाढ.
- निव्वळ नफा: १११ कोटी रु. (मागील वर्षी १३५ कोटी रु.). नफ्यात १८ टक्के वार्षिक घट, ६४ टक्के त्रैमासिक वाढ.
---------------------------------------
#KirloskarOilEngines
#FinancialResults
#Q4Results
#FY2025
#CorporateEarnings
#IndianManufacturing
#BusinessNews
#KOELResults
#DividendAnnouncement
#2x3ySuccess
Reviewed by ANN news network
on
५/१५/२०२५ ०४:४१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: