पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या थाटात साजरी करा: आमदार अमित गोरखे

 


पिंपरी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३१ मे २०२५ रोजी ३०० वी जयंती आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचे समाजाप्रती असलेले कार्य आणि त्याग भावी पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकारने राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच ६ मे २०२५ रोजी चोंडी (अहिल्यादेवीनगर) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. याच पार्श्वभूमीवर, पिंपरी-चिंचवड शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यासाठी निधी वाढवण्याची मागणी आमदार अमित गोरखे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे.

या संदर्भात बोलताना आमदार गोरखे म्हणाले, "अहिल्यादेवी होळकर या केवळ एक राजमाता नव्हत्या, तर त्या एक आदर्श शासिका, समाज सुधारक आणि जनतेच्या हितासाठी कार्य करणाऱ्या महान स्त्री होत्या. त्यांच्या जीवनकार्याचे स्मरण करणे ही आजच्या पिढीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे."

या जयंती वर्षानिमित्त महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रम, शैक्षणिक उपक्रम, महिला सक्षमीकरणासाठी विशेष मोहीम आणि त्यांच्या जीवनावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याची सूचना आमदार गोरखे यांनी आयुक्तांना दिली आहे.

यावेळी बोलताना आमदार अमित गोरखे यांनी असेही नमूद केले की, शहरातील तरुण पिढीला अहिल्यादेवींच्या प्रेरणादायी कार्याची ओळख करून देण्यासाठी महापालिकेने विशेष प्रयत्न करावेत. यासाठी दरवर्षी दिला जाणारा १ लाख रुपयांचा निधी वाढवून यावर्षी ५० लाख रुपये करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

......................................

#AhilyadeviHolkar300

#AmitGorkhe

#PimpriChinchwad

#JayantiCelebration

#SocialReformer

#MaharashtraCulture

#FundsRequest

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या थाटात साजरी करा: आमदार अमित गोरखे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या थाटात साजरी करा: आमदार अमित गोरखे Reviewed by ANN news network on ५/०८/२०२५ ०२:५०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".