पिंपरी, लोणावळ्यातील माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

 


मुंबई : पिंपरी-चिंचवड आणि लोणावळा येथील विविध पक्षांतील माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे भाजपचे माजी नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, लोणावळा येथील माजी नगरसेविका कल्पना आखाडे, माजी नगरसेविका सिंधुताई परदेशी, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश युवक सचिव राजेश वाघोले आणि ठाकरे गटाचे मावळ तालुका संघटक मदन शेडगे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

मुंबई येथे झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले. खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शिवसेना मावळ तालुकाप्रमुख राजूभाऊ खांडभोर, युवासेना उपजिल्हा प्रमुख दत्ताशेठ केदारी, शिवसेना मावळ उपतालुका प्रमुख राम सावंत, शिवसेना लोणावळा शहरप्रमुख संजय भोईर, शिवसेना देहूगाव शहरप्रमुख सुनील हगवणे, शीलाताई भोंडवे आणि शिवसेना महिला शहर संघटिका शुभांगी काळंगे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी ठाकरे गटाचे उपतालुकाप्रमुख सोमनाथ कोंडे, उपशहर प्रमुख प्रकाश पठारे, संघटक रमेश नगरकर, उपविभाग प्रमुख अनंत जांभळे, उपविभाग प्रमुख हनुमंत ठाकर, उपशहर प्रमुख कामशेत सुरेश लाड, उपशहर प्रमुख कामशेत वैभव हजारे, राष्ट्रवादी औद्योगिक विभाग अध्यक्ष नवनाथ हरपुडे, ठाकरे गट शाखाप्रमुख श्रीपती तुर्डे, शाखाप्रमुख कैलास खरमारे, संघटिका अनिताताई गायकवाड, सहशहर संघटिका प्रियाताई पवार, उपशहर प्रमुख लोणावळा विजय आखाडे, शाखाप्रमुख संकेत जाधव, उपसरपंच ईश्वर वाघोले, उपविभाग प्रमुख लोणावळा अनंत आंद्रे, दत्तात्रय झडे, भाऊसाहेब सकाटे, उदय वावरे आणि संकेत जाधव यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, "उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यावर आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. या सर्वांना पक्षात मान आणि सन्मान दिला जाईल. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार असून, शिवसेना पूर्ण ताकदीने निवडणुकीला सामोरे जाईल."

......................................

#ShivSena

#EknathShinde

#PimpriChinchwad

#Lonavala

#PartySwitch

#PoliticalNews

#SrirangBarne

पिंपरी, लोणावळ्यातील माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश पिंपरी, लोणावळ्यातील माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश Reviewed by ANN news network on ५/०८/२०२५ ०३:११:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".