गेली ४८ वर्षे शेकापक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते असलेल्या जे.एम. म्हात्रे यांनी महाविकास आघाडीने शेकापवर केलेल्या अन्यायामुळे हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. "महाविकास आघाडीतून बाहेर पडून शेकाप अबाधित ठेवण्याची विनंती पक्षश्रेष्ठींनी फेटाळल्यामुळे मुख्य प्रवाहात काम करण्याचा निर्णय घेतला," असे त्यांनी सांगितले.
शेकापला रायगडमध्ये गेल्या महिन्यात हा तिसरा मोठा धक्का आहे. याआधी पंडितशेठ पाटील, ॲड. आस्वाद पाटील यांनी अलिबागमध्ये आणि प्रभुदास भोईर यांनी पनवेलमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता.
रवींद्र चव्हाण यांनी "पंतप्रधान मोदीजींचे कणखर नेतृत्व आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कुशल नेतृत्वामुळे भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष बनला आहे," असे म्हटले.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी "जे.एम. म्हात्रे यांच्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढल्याने विरोधकांना बिनविरोध देण्याशिवाय पर्याय नाही," असे सांगितले.
या प्रवेश सोहळ्याला खासदार धैर्यशिल पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
-------------------------------------
#RaigadPolitics
#BJPGrowth
#JMMhatre
#ShekaPSetback
#MahaVikasAghadi
Reviewed by ANN news network
on
५/११/२०२५ १२:४२:०० PM
Rating:

.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: