या सर्वेक्षणात स्वयंसहाय्यता गटांतील २५० हून अधिक प्रशिक्षित महिलांच्या माध्यमातून प्रत्यक्ष भेटी देऊन नागरिकांचा अभिप्राय घेतला जात आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचा समाज विकास विभाग आणि टाटा स्ट्राईव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने 'सक्षमा' उपक्रमांतर्गत ही मोहीम राबविली जात असून, महापालिकेचा सिटी ट्रान्सफॉर्मेशन ऑफिस (सीटीओ) याला सक्रिय सहकार्य करत आहे.
अधिकाधिक नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने ऑनलाइन माध्यमांचाही वापर केला आहे. महापालिकेच्या विविध विभागीय कार्यालयांमध्ये आणि शहरातील प्रमुख सार्वजनिक ठिकाणी क्यूआर कोड लावण्यात आले आहेत. नागरिक हे क्यूआर कोड स्कॅन करून ऑनलाइन सर्वेक्षणात सहभागी होऊ शकतात. तसेच, महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरूनही सर्वेक्षणात सहभागी होता येणार आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री. शेखर सिंह यांनी या उपक्रमाबाबत बोलताना म्हटले की, "नागरिकांचे मत हेच आपल्या शहराच्या आगामी वाटचालीसाठी दिशादर्शक ठरणार आहे." त्यांनी नागरिकांना सर्वेक्षणात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले असून, स्वयंसहाय्यता गटातील महिलांना सहकार्य करण्याचे आणि सर्वेक्षण फॉर्ममध्ये प्रामाणिक मत नोंदवण्याचे आवाहनही केले आहे
-------------------------------------
#PCMC
#PimpriChinchwad
#SmartCity
#CitizenSurvey
#UrbanDevelopment
#PCMC50
#CommunityParticipation
#DigitalGovernance
#MaharashtraNews
#SHGEmpowerment
Reviewed by ANN news network
on
५/११/२०२५ ०१:१६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: