अहिल्यानगर, दि. २९ (प्रतिनिधी): अहिल्यानगर जिल्ह्यातील मौजे चौंडी, ता. जामखेड येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती स्थळाच्या जतन आणि संवर्धनासाठी शासनाने ६८१.३२ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला प्रशासकीय मान्यता दिली आहे.
या आराखड्यांतर्गत प्रस्तावित कामे ३१ मार्च २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
या प्रकल्पासाठी निधी नियोजन विभागामार्फत उपलब्ध करून दिला जाणार असून, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत त्याचे व्यवस्थापन केले जाईल.
या विकास आराखड्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृती स्थळाचे जतन आणि संवर्धन होऊन परिसरातील सुविधा वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
- -------------------------------------------------------------------------------------------
- #AhilyadeviHolkar
- #Chondi
- #MaharashtraTourism
- #Heritage
- #DevelopmentProject
- #Ahmadiynagar
- #IndianHistory
Reviewed by ANN news network
on
५/२९/२०२५ ०७:०८:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: