दौंड, दि. २९ (प्रतिनिधी): दौंड येथे २६ मे २०२५ रोजी पावसामुळे जुन्या बांधकामाची भिंत कोसळून जखमी झालेल्या श्रीमती ताराबाई विश्वचंद आहिर (वय ७५) यांचे उपचारादरम्यान निधन झाले होते. या दुर्घटनेतील प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज त्यांच्या वारसांना ४ लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे.
या मदतीचे प्रमाणपत्र दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या हस्ते श्रीमती आहिर यांच्या वारसांना प्रदान करण्यात आले. पावसामुळे झालेल्या या दुर्दैवी घटनेत एका ज्येष्ठ महिलेचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आमदार राहुलदादा कुल यांनी तातडीने प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून मृताच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले, ज्याचे फळ म्हणून आज ही मदत मंजूर झाली आहे.
यावेळी आमदार राहुलदादा कुल यांनी मृताच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आणि शासनाच्या वतीने शक्य ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. प्रशासनाकडून तात्काळ मदत मिळाल्याने कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
- #Daund
- #WallCollapseTragedy
- #RainAccident
- #FinancialRelief
- #RahulKul
- #GovernmentAid
- #MaharashtraNews
- #AccidentalDeath
Reviewed by ANN news network
on
५/२९/२०२५ ०६:५८:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: