चाकण: चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत २८ मे २०२५ रोजी रात्री १०:४८ वाजता अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला आहे. मौजे नाणेकरवाडी गावच्या हद्दीत, जिम कॅप इलेक्ट्रॉनिक कंपनीच्या बाजूला, नईम चौधरी यांच्या मालकीच्या प्लॉटिंगमधील रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली.
पोलीस हवालदार भैरोबा मनोहर यादव (ब.नं. ११२२, चाकण पोलीस ठाणे) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आकाश सिंग अजयप्रताप सिंग ठाकूर (वय २६ वर्षे) याला ताब्यात घेतले आहे. आरोपी निघोजे, ता. खेड, जि. पुणे येथील रहिवासी असून, मूळचा शक्तीनगर बस्ती, आय चौपरा दमोहा, मध्य प्रदेश येथील आहे.
आरोपीच्या ताब्यातील सॅगमध्ये तब्बल ६०,४०० रुपये किंमतीचा १ किलो ७८ ग्रॅम वजनाचा गांजा हा अमली पदार्थ बेकायदेशीररित्या बाळगताना आढळून आला आहे. हे प्रमाण पहा तर हा गांजा मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आणला गेला होता. गुन्हा दाखल होण्याची वेळ २९ मे २०२५ रोजी पहाटे ३:०८ वाजता नोंदविण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक कदम करत आहेत.
--------------------------------------------------------------------------------------------
#ChakanPolice #MajorDrugBust #CannabisSeizure #InterstateCrime #AntiNarcotics #PimpriChinchwad #MadhyaPradesh
Reviewed by ANN news network
on
५/२९/२०२५ ०४:२५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: