शेअर मार्केटच्या नावावर बाणेरमधील नागरिकाची फसवणूक

 


२५ लाख रुपयांचा गंडा घातला

बाणेर: बाणेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ४० वर्षीय व्यक्तीची ऑनलाइन शेअर ट्रेडिंगच्या नावावर तब्बल २५ लाख ८९ हजार २४ रुपये आणि ३ पैसेची मोटी फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला एका अज्ञात व्यक्तीने मोबाईलवर संपर्क साधला आणि स्वतःला एका प्रतिष्ठित शेअर ट्रेडिंग कंपनीचा एजंट असल्याचे भासवले. आरोपीने फिर्यादीला शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल असे आमिष दाखवले आणि चांगल्या नफ्याचे आश्वासन दिले.

आरोपीच्या फसव्या बोलण्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने त्याने सांगितलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वेळोवेळी एकूण २५ लाख ८९ हजार २४ रुपये आणि ३ पैसे जमा केले. मात्र, अनेक दिवस उलटूनही कोणताही परतावा न मिळाल्याने फिर्यादीच्या लक्षात आले की आपली मोठी फसवणूक झाली आहे. त्यानंतर त्याने बाणेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. चंद्रशेखर सावंत  करत आहेत. पोलीस प्रशासनाने या प्रकारच्या ऑनलाइन फसवणुकींपासून बचावासाठी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------

#OnlineFraud #CyberCrime #BanerPolice #InvestmentScam #ShareTradingFraud #FinancialCrime #PuneCrime

शेअर मार्केटच्या नावावर बाणेरमधील नागरिकाची फसवणूक शेअर मार्केटच्या नावावर बाणेरमधील नागरिकाची फसवणूक Reviewed by ANN news network on ५/२९/२०२५ ०४:२०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".