अल्पसंख्यांक विभागाअंतर्गत सुरू असलेल्या योजनांच्या कामाचा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी घेतला आढावा
मुंबई – अल्पसंख्यांक विभागामार्फत सुरू असलेल्या मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ, जैन आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्रराज्य हज समितीच्या कामकाजाबाबत अल्पसंख्यांक राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज मंत्रालयात आढावा घेतला.
मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळामार्फत जे कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यावर देखरेख ठेवावी आणि परताव्याचे प्रमाण वाढविण्यात यावे. तसेच जैन आर्थिक विकास महामंडळाला केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या निधीसाठी पाठपुरावा करण्यात यावा. या महामंडळाच्या पद निर्मिती आणि भरती प्रक्रिया राबविली बाबत आढावा घेतला सोबतच सर्व पायाभूत सुविधांचा विकास करण्यात बाबत उपाय योजना करण्यात यावेत तसेच जास्तीत जास्त अल्पसंख्यांक वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात यावेत अशा सूचनाही राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी यावेळी दिल्या. तक्रारींसाठी १८२२५७८६ या टोल फ्री नंबर जास्तीत जास्त लोकांपर्यत पाहोचावा. पंजाबी साहित्य अकादमी आणि उर्दु साहित्य अकादमीसाठी मिळणाऱ्या निधीचा योजनेअंतर्गत असलेल्या कार्यक्रमासाठी वापर करून जास्तीत जास्त साहित्यीक आणि साहित्य प्रेमींना त्याचा लाभ मिळेत यासाठी प्रयत्न करावेत.
हज यात्रेसाठी १८ हजार ९४९ हजी जात आहेत त्यांच्या प्रवासाचे नियोजन, सोयी सुविधा, आणि सुरक्षितेची सोय करावी अशा सुचनाही राज्यमंत्री मिसाळ यांनी यावेळी केल्या.
................................
#MadhuriMisal
#MinorityDevelopment
#MaulanaAzadCorporation
#JainCorporation
#Haj2025
#MaharashtraGovernment
#MumbaiNews
#UrduLiterature
#PunjabiAcademy
#MinorityWelfare

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: