१५० पेक्षा जास्त महिला कलाकारांना योग्य प्रशिक्षण देऊन, उत्तम संवादलेखन, कलात्मक कोरिओग्राफी, ध्वनिमुद्रण, व्हिडिओ ग्राफिक्स, आकर्षक प्रॉप्स व तांत्रिक इफेक्ट्सच्या साहाय्याने भव्य आणि रोमांचक अशा पौराणिक नृत्यनाटिकेचा 'समुद्र मंथन' कार्यक्रम सादर करण्यात आला. योगेश फूलफगर, प्रणव पद्मनाभ, अनिरुद्ध पद्मनाभ, शिल्पा पारेख व जागृती देसरडा-संघवी यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. या पौराणिक नृत्यनाटिकेला साजेशी अप्रतिम वेशभूषा हेमा बूब व रूपाली काबरा यांनी साकारली. सहेली ग्रुपच्या संगीता बिहाणी, मीना बिहाणी व संयोजन समितीने कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि उद्योजिका मोनिका पोफळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदिर येथे दि. ५ मे २०२५ रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी माहेश्वरी सहेली ग्रुपच्या ३५ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेण्यात आला. सहेली ग्रुपच्या वतीने अनेक सामाजिक संस्था आणि प्रकल्पांना यावेळी मदत देण्यात आली. पुणे जिल्हा माहेश्वरी समुदायाचे अध्यक्ष रतन राठी, महेश सोमाणी, संजय बियाणी यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
भव्य नृत्य नाट्याने जिंकली मने!
माहेश्वरी सहेली ग्रुप आयोजित 'समुद्र मंथन' या भव्य नृत्यनाटिकेने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. देव आणि दानवांच्या युद्धातून अमृत प्राप्तीसाठी केलेले समुद्र मंथन या नाट्यात अत्यंत प्रभावीपणे दर्शविण्यात आले. विशेष म्हणजे हे सादरीकरण केवळ महिला कलाकारांनी केले आणि त्यांनी प्रेक्षकांची भरभरून दाद मिळवली. या कार्यक्रमासाठी माहेश्वरी ग्रुपने दोन महिने कठोर मेहनत घेतली होती. 'ऑयस्टर इव्हेंट'च्या उत्कृष्ट सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
.................................
#MaheshwariSaheliGroup
#SamudraManthan
#PuneEvents
#DanceDrama
#MythologicalPlay
#OysterEvent
#WomenArtists
#CulturalEvent
Reviewed by ANN news network
on
५/०९/२०२५ ०५:२९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: