कर्मवीर अण्णांची ६६ वी पुण्यतिथी सातारा येथे साजरी करण्यात आली. त्यावेळी 'यमुना सामाजिक संस्थे'चे अध्यक्ष महेंद्र घरत यांना थोर देणगीदार म्हणून सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि शकुंतला ठाकूर यांनीही शरद पवार यांच्या हस्ते सत्कार स्वीकारला.
यावेळी माजी संरक्षण मंत्री शरद पवार म्हणाले, "रयत शिक्षण संस्थेची वाटचाल कालानुरूप सुरू आहे, अनेक देणगीदारांचे हात मदतीसाठी पुढे येत आहेत. त्यामुळे रयतची सर्वांगाने होत असलेली प्रगती अभिमानास्पद आहे."
या प्रसंगी सुप्रिया सुळे, रामशेठ ठाकूर, बाळाराम पाटील, जे. एम. म्हात्रे आदी उपस्थित होते. यावेळी 'रयत'चे सचिव विकास देशमुख यांनी प्रास्ताविक केले.
संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, भगिरथ शिंदे आणि रयतचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी 'रयत' मासिक, रयत विज्ञान पत्रिका, शोध मराठी मनाचा यांचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
.................................
#MahendraShethGharat
#SharadPawar
#RayatShikshanSanstha
#Satara
#SocialWork
#Education
#AjitPawar
#KarmaveerAnna
Reviewed by ANN news network
on
५/०९/२०२५ ०५:१९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: