पुणे-लोणावळा रेल्वे तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकच्या कामासाठी राज्य सरकारने निधी द्यावा : खासदार श्रीरंग बारणे

 


पिंपरी : पुणे-लोणावळा रेल्वे मार्गाच्या तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकच्या कामाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. हे काम सुरू करण्यासाठी राज्य सरकारने आपला ५० टक्के निधी तातडीने द्यावा, अशी मागणी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

खासदार बारणे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना या प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली आणि राज्य सरकारचा हिस्सा तातडीने देण्याची मागणी केली. ते म्हणाले, "गेल्या तीन दशकांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक पुणे-लोणावळा मार्गावर तिसरा आणि चौथा ट्रॅक व्हावा, अशी मागणी करत आहेत. २०१४ मध्ये मी खासदार झाल्यानंतर त्यासाठी पाठपुरावा सुरू केला. केंद्र सरकारने २०१५-१६ मध्ये या प्रकल्पाची घोषणा केली आणि विकास आराखडा (डीपीआर) तयार केला. १५ फेब्रुवारी २०१९ रोजी रेल्वे बोर्डाने महाराष्ट्र सरकारला प्रस्ताव पाठवला. २०१७ मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पात यासाठी तरतूदही करण्यात आली. या प्रकल्पाचा ५० टक्के खर्च केंद्र सरकार आणि ५० टक्के खर्च राज्य सरकार करणार आहे. राज्य सरकारच्या हिश्श्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांचाही सहभाग आहे. निधीअभावी हा प्रकल्प अनेक वर्षे रखडला आहे. नागरिकांची सोय आणि लोकल सेवा सुरळीत होण्यासाठी हे ट्रॅक होणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्य सरकारने आपला हिस्सा तातडीने द्यावा."

खासदार बारणे यांनी सांगितले की, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव या प्रकल्पाला सहकार्य करत आहेत. मागील आठवड्यात पुणे दौऱ्यावर आले असताना त्यांनी या कामाला तत्काळ सुरुवात करण्याचे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही निधी देण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्य सरकारचा हिस्सा मिळाल्यास लवकरच कामाला सुरुवात होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

................................

#SrirangBarne

#PuneLonavalaRailway

#RailwayDevelopment

#MaharashtraGovernment

#DevendraFadnavis

#RailwayProject

#PublicTransport

पुणे-लोणावळा रेल्वे तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकच्या कामासाठी राज्य सरकारने निधी द्यावा : खासदार श्रीरंग बारणे पुणे-लोणावळा रेल्वे तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकच्या कामासाठी राज्य सरकारने निधी द्यावा : खासदार श्रीरंग बारणे Reviewed by ANN news network on ५/०९/२०२५ ०५:०४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".