वनपरिक्षेत्र अधिकारी कर्नाळा पक्षी अभयारण्याचा भोंगळ कारभार उघड
उरण : भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेला माहितीचा अधिकार वनपरिक्षेत्र अधिकारी, कर्नाळा पक्षी अभयारण्य, पनवेल येथे अक्षरशः पायदळी तुडवला जात असल्याचे समोर आले आहे. माहितीच्या अधिकारांतर्गत (आरटीआय) मागविलेल्या माहितीकडे अधिकार्यांनी सर्रास दुर्लक्ष केल्याने, त्यांच्या कामकाजातील भोंगळपणा आणि उदासीनतेचे दर्शन घडले आहे.
गजानन सुधीर सलांके (मु. कल्हे, पो. बारापाडा, ता. पनवेल, जि. रायगड) यांनी १० फेब्रुवारी २०२५ रोजी माहितीच्या अधिकारात अर्ज दाखल करून आर्थिक वर्ष २०२२-२३ ते २०२४-२५ दरम्यान कर्नाळा पक्षी अभयारण्यात राबविल्या गेलेल्या शासकीय व पर्यटन विकास योजनांबाबत सविस्तर माहिती मागविली होती. नियमाप्रमाणे ३० दिवसांत माहिती देणे बंधनकारक असतानाही, आजपर्यंत कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही.
या प्रकरणावरून वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचे आणि कामचुकार वृत्तीचे चित्र स्पष्ट झाले आहे. शासकीय कामांमध्ये पारदर्शकता राखण्याची जबाबदारी सोडून त्यांनी माहितीच्या अधिकाराचीही अवहेलना केली आहे.
सदर प्रकरणात महाराष्ट्र वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
...........................
#KarnalaBirdSanctuary
#RightToInformation
#ForestDepartment
#UranNews
#Raigad
#AdministrativeCorruption
#MaharashtraNews

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: