उरण (प्रतिनिधी) – उरण वाहतूक पोलिसांनी महामार्गांवर व मुख्य रस्त्यांवर अनधिकृतपणे पार्किंग करणाऱ्या अवजड वाहनांवर कडक कारवाई करत विशेष मोहीम राबवली. नवी मुंबईचे वाहतूक पोलिस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक पोलिस आयुक्त विठ्ठल कुबडे यांच्या निर्देशाने ही मोहीम राबविण्यात आली.
सीएफएस व एमटी यार्डच्या बाहेर पार्क केलेल्या कंटेनर वाहनांवर भारतीय न्याय संहिता २८५ अंतर्गत ९ गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच मोटर वाहन कायदा १२२/१७७ अंतर्गत ३६३ कारवाया करत दंडात्मक कारवाई करण्यात आली.
वाहतूक सुरळीत राहावी व अपघात टाळावेत, यासाठी महामार्ग व गोदाम परिसरात कोणत्याही प्रकारचे पार्किंग टाळावे, असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल दहिफळे यांनी वाहनचालकांना केले आहे. अधिकृत पार्किंगमध्येच वाहने लावावीत, अन्यथा कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
..................................
#UranNews
#TrafficPolice
#HighwayAction
#IllegalParking
#UranTraffic
#MotorVehicleAct
#NH4B
#UranMaharashtra
#InstructionforDrivers

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: