रेल्वे परिसरातील मुलांच्या सुरक्षेवर विशेष चर्चा
पुणे (विशेष वार्ताहर): पुणे रेल्वे विभागाने आज बाल सुरक्षा संदर्भात महत्वपूर्ण बैठक घेतली. श्री ब्रिजेश कुमार सिंह, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त श्रीमती प्रियांका शर्मा, पोलीस स्टेशन प्रभारी, रेल्वे पोलीस अधिकारी आणि चाइल्ड हेल्प डेस्कचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत रेल्वे परिसरातील मुलांच्या सुरक्षेबाबत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. जानेवारी ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत एकूण 228 मुलांना बाल कल्याण समितीकडे (CWC) सुपूर्द करण्यात आले असून या कामगिरीचे अधिकाऱ्यांनी कौतुक केले.
अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी सर्व उपस्थित अधिकाऱ्यांना रेल्वेच्या आवारात आढळणाऱ्या मुलांच्या सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी मानक कार्यपद्धती (एसओपी) मधील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या.
बैठकीत मुलभूत सुविधांवर विस्तृत चर्चा झाली. कोणत्याही अडचणीसाठी अधिकाऱ्यांनी थेट अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापकांशी संपर्क साधावा, असे आश्वासन देण्यात आले. या प्रयत्नांमागचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे रेल्वे परिसरातील मुलांचे संरक्षण आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे.
Reviewed by ANN news network
on
११/१८/२०२४ ०८:३४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: