कोल्हापूरकरांना अजित गव्हाणे यांचे नेतृत्व मान्य

 


भोसरी :  कोल्हापूरकरांच्या मते, अजित गव्हाणे हे गेल्या वीस वर्षांपासून भोसरीतील जनतेशी स्नेह जपत आलेले आहेत. संयमी, मितभाषी आणि उच्चशिक्षित असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे. स्थायी समिती अध्यक्ष म्हणून काम पाहताना त्यांनी शहराला विकासाच्या उंचीवर नेण्याचे उल्लेखनीय काम केले आहे. त्यांच्या कारकिर्दीवर कुठेही गालबोट लागलेले नाही. अशा संयमी, सरळमार्गी आणि उच्च शिक्षित नेतृत्वाची भोसरी विधानसभा मतदारसंघाला नितांत गरज आहे, असे कोल्हापूरवासियांनी संवाद मेळाव्यात आपल्या भावना मांडल्या.  

महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ रविवारी "संवाद मेळाव्या"चे आयोजन सीझन बँक्वेट हॉल येथे करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार विलास लांडे, मेळाव्याचे संयोजक संजय चौगुले, सुनील शिंदे, मैथिली कमळकर, सुनील पाटील, वैभव चौगुले, सचिन पाटील, शंकर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

विलास लांडे यांचे विचार 

मेळाव्यामध्ये माजी आमदार विलास लांडे म्हणाले, "भोसरी मतदारसंघातील स्थिती गेल्या दहा वर्षांमध्ये फारशी सुधारली नाही. त्यामुळे नागरिक आता परिवर्तनाच्या मनस्थितीत आहेत. विविध समस्यांमुळे नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. उद्योग-धंदे येथे स्थिरावण्यासाठी तयार नाहीत. तळवडे, मोशी, चिखली या भागातील लघुउद्योजकांना वीज पुरवठा आणि पाणीपुरवठ्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सत्ताधाऱ्यांना गेल्या दहा वर्षात पाण्याचे नियोजन करण्यात अपयश आले आहे."

कोल्हापूरवासियांची भावना 

या संवाद मेळाव्यात कोल्हापूरच्या रहिवाशांनी आपल्या भावना स्पष्ट केल्या. कोल्हापूरमधून पिंपरी चिंचवड शहरात व्यवसाय, रोजगार यासाठी आलेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. गेल्या २० ते २५ वर्षांपासून भोसरी परिसरात वास्तव्य करणाऱ्या या रहिवाशांनी शांतता, चांगल्या शैक्षणिक सुविधा, रस्ते, पाणी पुरवठा, आणि अखंड विजेच्या सुविधा या मूलभूत गरजा असल्याचे नमूद केले. अजित गव्हाणेंच्या पूर्वीच्या कामावर विश्वास ठेवून महाविकास आघाडीने त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कोल्हापूरवासियांनी अजित गव्हाणेंना पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

अजित गव्हाणे म्हणाले, "विविध समाज घटकांनी या शहराच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले आहे. कोल्हापूरकर नागरिकांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्यांच्या प्रत्येक मागणीचा आदर करून, मी प्राधान्याने या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे." 

- अजित गव्हाणे, उमेदवार, महाविकास आघाडी, भोसरी विधानसभा मतदारसंघ

कोल्हापूरकरांना अजित गव्हाणे यांचे नेतृत्व मान्य कोल्हापूरकरांना अजित गव्हाणे यांचे नेतृत्व मान्य Reviewed by ANN news network on ११/१८/२०२४ ०८:२४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".