गाठीभेटी घेत, नागरिकांशी संवाद साधत अजित गव्हाणे यांच्या प्रचाराची सांगता!

 


महिला सुरक्षा, शिक्षण, बेरोजगारी आणि रोजगार मुद्द्यावर परिवर्तन अटळ - अजित गव्हाणे

भोसरी :  भोसरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या गाठीभेटी घेत, त्यांच्याशी संवाद साधत महाविकास आघाडीचे भोसरी मतदारसंघाचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी त्यांच्या प्रचाराची सांगता सोमवारी (दि. 18) केली. नागरिकांच्या पुढाकारातून भोसरी मतदारसंघांमध्ये परिवर्तनाचा लढा उभारला. नागरिकांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आता नागरिकांच्या हाती निवडणूक सोपवून निवडणूक प्रचाराची सांगता केली असल्याच्या भावना अजित गव्हाणे यांनी यावेळी व्यक्त केल्या. सोमवारी प्रचाराच्या सांगता दौऱ्यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. महिला सुरक्षा, शिक्षण, बेरोजगारी आणि रोजगार या मुद्द्यावर महिलांनी यावेळी मतदारांना परिवर्तनाचे आवाहन देखील केले.

महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचाराची सांगता सोमवारी झाली. सोमवारी सकाळी त्यांनी भोसरी परिसरातील मंदिरांमध्ये दर्शन घेतले. यावेळी नागरिकांच्या गाठीभेटी त्यांनी घेतल्या. सकाळी त्यांच्या निवासस्थानी ज्येष्ठ नागरिक, परिसरातील महिला भगिनींनी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या. परिसरातील नागरिकांशी त्यांनी यावेळी संवाद देखील साधला. मुख्य म्हणजे आज त्यांच्या प्रचाराची सांगता महिला आघाडीच्या पुढाकारातून करण्यात आली. महिला भगिनींनी यावेळी फेटे परिधान करून 'राम कृष्ण हरी वाजवा तुतारी' अशा घोषणा देत प्रचाराची सांगता केली. जागोजागी अजित गव्हाणे यांना औक्षण करण्यात येत होते. साखर भरवत यावेळी गव्हाणे यांना विजयाचा तिलकही लावण्यात आला. आपले विजयासाठी महिला शक्तीची एकजूट परिवर्तनाची नांदी ठरेल अशा शुभेच्छा देखील देण्यात आल्या. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी नागरिकांना भावनिक साद घालत येत्या 20 नोव्हेंबर रोजी 'तुतारी वाजवणारा माणूस' या चिन्ह समोरील बटन दाबून अजित गव्हाणे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन देखील केले.

महिला शक्ति परिवर्तन घडवणार

महाविकास आघाडीचे भोसरी मतदारसंघातील अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचाराची सांगता करताना महिला आघाडीने पुढाकार घेतला. उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या महिला दडपशाही, गुंडगिरी आणि भ्रष्टाचाराला जुगारून परिवर्तन घडवणार असल्याचे उपस्थित महिलांनी सांगितले. महिला शक्ती यंदाच्या निवडणुकीत परिवर्तन घडवून भोसरी मतदारसंघांमध्ये इतिहास घडवतील असे देखील महिला पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. सुरुवातीपासूनच मतदारसंघातील प्रत्येक भागातून महिला भगिनींचे मोठे पाठबळ मिळाले आहे. माता-भगिनींची सुरक्षा, मुलांना चांगले शिक्षण आणि रोजगाराच्या मुद्द्यावर महिलांनी या निवडणुकीत परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे देखील महिलांनी नमूद केले.


दहा वर्षांपूर्वी विरोधकांनी नागरिकांना दिलेली आश्वासने पाळली नाहीत. मुख्य म्हणजे त्यांनी स्वतःच्या सहकाऱ्यांचा विश्वास देखील गेल्या दहा वर्षात गमावला. सर्वस्तरावर त्यांच्याबाबत चीड आहे. त्यांच्यातील अनेक जणांना परिवर्तन मान्य आहे. काही बाहेर पडले तर काही फक्त शरीराने त्यांच्याजवळ आहेत. ही सर्व नाराजी, चीड मतातून व्यक्त होणार आहे. या मतदारसंघाचा चेहरा बदलण्यासाठी, आपले गतवैभव प्राप्त करण्यासाठी, या मतदारसंघाला आलेले बकालपण घालवण्यासाठी येत्या 20 नोव्हेंबर रोजी "तुतारी वाजवणारा माणूस" या चिन्ह समोरील बटन दाबून मला संधी द्यावी.

 - अजित गव्हाणे, उमेदवार, महाविकास आघाडी, भोसरी विधानसभा मतदारसंघ

गाठीभेटी घेत, नागरिकांशी संवाद साधत अजित गव्हाणे यांच्या प्रचाराची सांगता! गाठीभेटी घेत, नागरिकांशी संवाद साधत अजित गव्हाणे यांच्या प्रचाराची सांगता! Reviewed by ANN news network on ११/१८/२०२४ ०८:४१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".