"राज्यातील ११ किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश होणार"
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील ऐतिहासिक वारसा आता देशाच्या पर्यटन केंद्राशी जोडला जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी केली आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी पर्यटन क्षेत्रातील विविध योजनांची माहिती दिली.
महाराष्ट्र आणि पुण्यातील ऐतिहासिक स्थळांना मिळणाऱ्या देश-विदेशी पर्यटकांच्या प्रतिसादाचा उल्लेख करत मंत्री शेखावत यांनी राज्यातील ११ किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर केल्याचे सांगितले. पुण्यातील शिवसृष्टी प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून ५० कोटी तर केंद्रीय पर्यटन विभागाकडून ८० कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे.
विविध राज्यांकडून आठ हजार कोटींच्या पर्यटन प्रकल्पांचे प्रस्ताव प्राप्त झाले असून, त्यावर लवकरच एकत्रित निर्णय घेतला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पुणे शहराच्या पर्यटन विकासाला आगामी काळात वेग देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
कार्यक्रमास भाजप प्रदेश महामंत्री राजेश पांडे, प्रवक्ते संदीप खर्डेकर, संजय मयेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
शेखावत यांनी यावेळी राजकीय भाष्यही केले. मोदी सरकारच्या विकासकामांचा आढावा घेत महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवरही त्यांनी भाष्य केले. कोविड काळातील व्यवस्थापन, आघाडी सरकारच्या कारभारावर टीका करत महायुती सरकारच्या विविध योजनांचा उल्लेख त्यांनी केला.
Reviewed by ANN news network
on
११/१८/२०२४ ०८:५५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: