महिलांचा अवमान करणाऱ्या महाविकास आघाडी नेत्यांविरुद्ध कारवाईची मागणी
पुणे (विशेष प्रतिनिधी): महिलांविषयी अवमानकारक वक्तव्ये आणि छत्रपतींच्या गादीचा सातत्याने होत असलेला अपमान यासंदर्भात महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या नेत्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर काँग्रेसचे आमदार व माजी मंत्री सतेज पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस नेत्यांची विकृत मानसिकता उघड झाली असल्याचे उपाध्ये यांनी नमूद केले.
"छिंदवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यापासून विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याच्या घटनेपर्यंत काँग्रेसने नेहमीच छत्रपतींच्या गादीचा अपमान केला आहे," असे उपाध्ये म्हणाले.
त्यांनी उबाठा गटाचे संजय राऊत यांच्या छत्रपतींच्या गादीच्या वारसाबद्दल पुरावा मागण्याच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. अरविंद सावंत यांनी शायना एन. सी. यांच्याबद्दल केलेल्या टीकेमुळे केवळ महिलांचाच नव्हे तर समस्त जनतेचा अपमान झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
"एकीकडे महिला अत्याचारांविरुद्ध आवाज उठवायचा आणि दुसरीकडे अशी वागणूक द्यायची, यातून काँग्रेसचे दुटप्पी धोरण स्पष्ट होते," अशी टीका करत उपाध्ये यांनी या सर्व नेत्यांविरुद्ध निवडणूक आयोगाने कारवाई करावी अशी मागणी केली.
Reviewed by ANN news network
on
११/०५/२०२४ ०५:१५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: