भापकरांनी केले कार्य अहवाल व गॅरेंटी पत्राचे वाटप
चिंचवड : स्वराज पक्षाचे अधिकृत उमेदवार मारुती भापकर यांनी आज चिंचवड विधानसभा मतदारसंघातील विविध भागांमध्ये व्यापक प्रचार दौरा राबविला. त्यांनी शहरातील १३ महत्वाच्या ठिकाणी सभा घेऊन कार्य अहवाल सादर केला आणि गॅरेंटी पत्राचे वाटप केले.
सकाळी १०.३० वाजता नवी सांगवी क्रांती चौकापासून सुरू झालेल्या या प्रचार दौऱ्यात रहाटणी, जगताप डेअरी, काटे पिंपळे, काळेवाडी, मस्कोबा चौक, थेरगाव, आदित्य बिर्ला हॉस्पिटल चौक, चिंचवडगाव, केशवनगर आदी महत्वाच्या ठिकाणांचा समावेश होता.
भापकरांच्या या प्रचार दौऱ्याला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला. त्यांनी विविध भागांमधील नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या आणि अपेक्षा समजून घेतल्या.
दुपारी ३.३० वाजेपर्यंत चालू असलेल्या या दौऱ्याचा चिंचवड गावात समारोप करण्यात आला.
Reviewed by ANN news network
on
११/१८/२०२४ ०७:५८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: