चिंचवड विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांनी काढलेल्या भव्य पदयात्रेला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. वसंतदादा पाटील पुतळ्यापासून सुरू झालेल्या या पदयात्रेने सांगवी-पिंपळे गुरव परिसरातील विविध मार्गांवर प्रचाराची सांगता केली.
सुरुवातीला तिरंगी लढत वाटत असली तरी आता ही लढत 'कपाट' विरुद्ध 'कमळ' अशी द्विरंगी झाली असून, भोईर यांच्या पारड्यात कल असल्याचे चित्र दिसत आहे. विविध जाती-धर्माच्या संघटनांनी भोईर यांना दिलेला पाठिंबा लक्षणीय ठरला आहे.
"चिंचवडला आता बदल हवा आहे," असे सांगत भोईर यांनी अनेक शक्तिशाली नेत्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचे सूचित केले. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
पदयात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांनी 'कपाट' चिन्ह निश्चितपणे विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला. भोईर यांनी मतदारसंघातील जनतेच्या समस्या सोडवण्याचा निर्धार व्यक्त केला.
या पदयात्रेचा मार्ग जुनी सांगवी, ढोरे नगर, क्रांती चौक, शितोळे नगर, काटे पुरम चौक, पीडब्ल्यूडी ग्राउंड, डायनासोर गार्डन, संविधान चौक आणि पिंपळे गुरव साई चौक या भागांमधून गेला.
Reviewed by ANN news network
on
११/१८/२०२४ ०८:०१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: