चिंचवड, प्रतिनिधी - चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा बुधवारी, ६ नोव्हेंबर रोजी काळेवाडी फाटा, कस्पटे वस्ती येथील अँबियन्स हॉटेल शेजारील मैदानात सायंकाळी ६ वाजता होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांची ही पहिली प्रचार सभा असेल.
फडणवीस यांचे पुढील सहा दिवसांत २१ सभा होणार असून, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातही या सभा घेतल्या जाणार आहेत. या प्रचार मोहिमेची सुरुवात चिंचवड विधानसभा मतदारसंघातील काळेवाडी फाटा येथील सभेने होणार आहे.
या सभेत महायुतीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि आरपीआय (आठवले) यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. यासाठी महायुतीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.
चिंचवड मतदारसंघातील नागरिकांना या सभेला मोठ्या संख्येने आणि उत्स्फूर्तपणे उपस्थित राहण्याचे आवाहन महायुतीकडून करण्यात आले आहे.
Reviewed by ANN news network
on
११/०५/२०२४ ०५:४७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: