पिंपरी : पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महायुती राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आ. अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ जाहीरनाम्याचे प्रकाशन बुधवार, ६ नोव्हेंबर रोजी दापोडी येथील फिरंगाई मंदिर परिसरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.
बुधवारी सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते आणि महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा ऑनलाइन पद्धतीने प्रकाशित केला जाईल.
त्यानंतर, सकाळी ११:३० वाजता फिरंगाई देवीचे दर्शन घेऊन दापोडी गावातून प्रचार फेरीला प्रारंभ होईल. या प्रचार फेरीचा मार्ग सिद्धार्थ नगर, नरवीर तानाजी पुतळा, पवार वस्ती, एसएमएस कॉलनी, आतार वीटभट्टी, महाविहार, काचीवाडा, फुलेनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, खालची आळी विठ्ठल मंदिर, समर्थ व्यायाम शाळा, शिवम मित्र मंडळ, आझाद मित्र मंडळ, वरची आळी विठ्ठल मंदिर, ११ नंबर बस स्टॉप, मंत्री कॉम्प्लेक्स, सुंदर बाग, गणेश गार्डन या मार्गाने असणार आहे.
महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या प्रचार फेरीत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Reviewed by ANN news network
on
११/०५/२०२४ ०५:५७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: