चिंचवड (प्रतिनिधी) : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप - शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस - रिपाइं (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ आज भव्य महाबाईक रॅली काढण्यात आली. या महाबाईक रॅलीच्या माध्यमातून शंकर जगताप यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत मतदारसंघातील नागरिकांना अभिवादन केले.
लोकनेते स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मृती स्थळाला अभिवादन करून या महाबाईक रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. ही रॅली पिंपळे गुरव, सृष्टी चौक, रहाटणी, काळेवाडी, वाकड, आकुर्डी, वाल्हेकरवाडी आणि रावेत अशा प्रमुख ठिकाणांवरून जात, विविध चौकांमध्ये मोठ्या जल्लोषात पार पडली. रॅलीच्या मार्गात गावागावांमध्ये आणि चौकाचौकांमध्ये ग्रामस्थांनी ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि फुलांच्या उधळणीद्वारे जगताप यांचे स्वागत केले.
महाबाईक रॅलीत महिला कार्यकर्त्यांचाही मोठा सहभाग पहायला मिळाला. मतदारसंघातील विविध सामाजिक संघटनांनी शंकर जगताप यांना पाठिंबा देत मतदान करण्याचे आश्वासन दिले. या रॅलीला आमदार अश्विनी जगताप, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे आणि इतर महायुतीचे नेते तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
शिस्तबद्ध आणि शांततेचे दर्शन
हजारो कार्यकर्त्यांच्या या रॅलीमध्ये शिस्तबद्धता आणि शांततेचे दर्शन घडले. रॅलीमुळे नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची विशेष काळजी घेतली गेली. त्यामुळे चिंचवड मतदारसंघातील नागरिकांनी रॅलीत सहभागी कार्यकर्त्यांचे कौतुक केले. नागरिकांनी या महाबाईक रॅलीला "महाविजय रॅली" असे नाव दिले.
शंकर जगताप यांचे आवाहन
चिंचवडच्या जनतेने मागील अनेक वर्षांपासून स्व. लक्ष्मणभाऊ जगताप आणि आमदार अश्विनी जगताप यांच्यावर प्रचंड विश्वास ठेवला आहे. यावेळीही त्याच विश्वासाच्या बळावर शंकर जगताप यांनी मतदारांना आशीर्वादरुपी मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यांची प्रार्थना आहे की, या निवडणुकीत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून एक प्रगतिशील महाराष्ट्र घडविण्यासाठी महायुतीला संधी द्यावी.
"मागील अनेक वर्षांपासून चिंचवडच्या जनतेने स्व. लक्ष्मणभाऊ जगताप व आमदार अश्विनी जगताप यांच्या माध्यमातून आमच्यावर प्रचंड विश्वास व्यक्त केला आहे. यावेळीही तुमचा हाच विश्वास आणि प्रेम तुमच्या मतरुपी आशीर्वादातून मला मिळावा अशी प्रार्थना मी आपणांस करत आहे. मी आपल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे. चिंचवड मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींना मी विनम्र आवाहन करतो की, येणाऱ्या २० तारखेला आपण सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावून एक सक्षम आणि प्रगतिशील महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्यात पुन्हा एकदा जनतेचे सरकार म्हणजेच आपले महायुतीचे सरकार आणण्यासाठी आपले बहुमूल्य योगदान द्यावे."
- शंकर जगताप, महायुतीचे उमेदवार
Reviewed by ANN news network
on
११/१८/२०२४ ०८:१६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: