"चर्होलीकरांच्या पाणी प्रश्नावर लवकरच तोडगा" - अजित गव्हाणे
चर्होली (विशेष प्रतिनिधी): भोसरी विधानसभा मतदारसंघातील चर्होली परिसरात महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांनी आज प्रचाराला सुरुवात केली. या वेळी त्यांनी चर्होलीकरांचा प्रलंबित पाणी प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन दिले.
गेल्या काही वर्षांत चर्होली परिसरात मोठ्या प्रमाणावर गृहनिर्माण संस्था उभारल्या गेल्या आहेत. गावठाणासह वाढत्या सोसायट्यांमुळे पाण्याचे योग्य नियोजन ही काळाची गरज बनली आहे. या पार्श्वभूमीवर गव्हाणे यांनी पाणी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.
प्रचार रॅलीला हजारो नागरिकांसह महिला भगिनींचा मोठा प्रतिसाद लाभला. ठिकठिकाणी महिलांकडून गव्हाणे यांचे औक्षण करण्यात आले. यावेळी त्यांनी महिलांना पाणीटंचाईपासून मुक्त करण्याचे वचन दिले.
"या परिसरात हजारो नागरिक वास्तव्याला असून, वेगाने विकसित होत असलेल्या भागात सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी कोणतेही नियोजन नाही. पाणीटंचाईपासून मुक्तता देण्यासाठी सक्षम उपायोजना केल्या जातील," असे गव्हाणे यांनी सांगितले.
प्रचार मोहिमेत "तुतारी वाजवा, ७/१२ वाचवा" ही घोषणा लक्षवेधी ठरली. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते २० नोव्हेंबरच्या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार करत आहेत.
या वेळी माजी नगरसेविका विनया तापकीर, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप आबा तापकीर, दत्ताभाऊ बुर्डे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
११/०५/२०२४ ०६:०३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: