सनी निम्हण यांच्या कार्याची वाखाणणी; नेतृत्वाला मिळणार संधी
पुणे - माजी आमदार विनायक (आबा) निम्हण यांच्या द्वितीय पुण्यस्मरणदिनी आयोजित हरिकीर्तन सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सनी निम्हण यांच्या नेतृत्वाला खंबीर पाठिंबा जाहीर केला.
"आबा निम्हण यांच्याप्रमाणेच त्यांचे पुत्र सनी निम्हण यांनीही सामाजिक कार्याची परंपरा जपली आहे. विविध उपक्रमांद्वारे त्यांनी पुणे शहरात स्वतःचे वेगळे व्यक्तिमत्व निर्माण केले असून, त्यांच्या नेतृत्वाला योग्य वाव मिळावा यासाठी मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन," असे फडणवीस यांनी सांगितले.
ह.भ.प. संजय महाराज पाचपोर यांच्या हरिकीर्तन कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सनी निम्हण यांनी राबवलेल्या विविध आरोग्य शिबिरांचे कौतुक करताना फडणवीस यांनी विशेषतः पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या आरोग्य शिबिराचा उल्लेख केला. गरीब रुग्णांना मोफत उपचार व महागडी शस्त्रक्रिया करून देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचीही त्यांनी प्रशंसा केली.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही सनी निम्हण यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी आबा निम्हण यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांना आदरांजली वाहिली.
Reviewed by ANN news network
on
११/०४/२०२४ ०७:२५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: