पुणे - पर्वती विधानसभा मतदारसंघात गेल्या १५ वर्षांत केलेल्या नियोजनबद्ध विकासकामांच्या जोरावर मोठा विजय मिळवू, असा विश्वास महायुतीच्या उमेदवार आमदार माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केला.
बिबवेवाडी परिसरात आयोजित पदयात्रेदरम्यान त्या बोलत होत्या. मेट्रो, स्वारगेट मल्टिमोडल हब, बिबवेवाडीतील ५०० खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय, पु. ल. देशपांडे उद्यानातील कलाग्राम, सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा त्यांनी उल्लेख केला.
"गेल्या १५ वर्षांत आमदार म्हणून गतिमान आणि शाश्वत विकास केला असून, मतदारांचा विश्वास संपादन केला आहे. महायुतीने सलग चौथ्यांदा दिलेली उमेदवारी हा त्याचाच परिपाक आहे," असे मिसाळ म्हणाल्या.
१७६ कोटी रुपयांच्या आमदार आणि विशेष निधीचा विनियोग, समान पाणीपुरवठा योजना, पर्वती टेकडीचे सुशोभिकरण, तळजाई वन आराखडा यांसारख्या विकासकामांचाही त्यांनी आढावा घेतला.
महायुतीचे संघटन भक्कम असून विरोधी महाआघाडीत बिघाडी झाल्याचे सांगत त्यांनी विक्रमी मताधिक्याचा विश्वास व्यक्त केला.
पदयात्रेत दीपक मिसाळ, करण मिसाळ, मानसी देशपांडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.
Reviewed by ANN news network
on
११/०४/२०२४ ०७:३५:०० PM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: