कोट्यवधींची विकासकामे दाखवत जगताप यांचा विरोधकांना दणका
वाकड : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील वाकड भागाचा विकास स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांच्यामुळेच शक्य झाला असून, स्थानिक उमेदवारांमुळे अनेक वर्षे विकासकामे रखडली होती, असा आरोप महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी केला.
दीपावलीनिमित्त वाकडमधील विविध वस्त्यांना भेटी देताना जगताप यांचे स्थानिक रहिवाशांनी जंगी स्वागत केले. या वेळी आल्हाट वस्ती, विनोदे वस्ती, गवळी वस्ती, पाखरे वस्ती, कलाटे वस्ती, वाकडकर वस्ती आणि सायकर वस्ती परिसरातील नागरिकांनी त्यांना पाठिंबा जाहीर केला.
जगताप यांनी सांगितले की, आमदार निधीतून वाकडमध्ये सांस्कृतिक भवन, योगा हॉल, ओपन जिम, वाहतूक बेटे, ई-टॉयलेट्स, समाज मंदिर, सोलर सिस्टीम आदी सुमारे साडेतीन कोटी रुपयांची विकासकामे करण्यात आली आहेत. विरोधकांचे विकासकामे न झाल्याचे आरोप बिनबुडाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या वेळी माजी नगरसेवक विनायक गायकवाड, आरपीआयचे शहराध्यक्ष कुणाल वावळकर, भारती विनोदे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शंकर जगताप यांच्या प्रचार मोहिमेला समाजातील सर्व स्तरातून, विशेषतः महिला वर्गाकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
Reviewed by ANN news network
on
११/०४/२०२४ ०६:४६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: