महाराष्ट्र स्वराज पक्षाचे उमेदवार मारुती भापकर यांच्या कार्यअहवाल व गॅरेंटीपत्राचे छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते प्रकाशन
चिंचवड : २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र स्वराज पक्ष, प्रहार जनशक्ती पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भारतीय जवान किसान पार्टी, ऑल इंडिया पॅंथर सेना (परिवर्तन महाशक्ती) यांचे अधिकृत उमेदवार भापकर मारुती साहेबराव यांच्या कार्यअहवाल व गॅरेंटीपत्राचे प्रकाशन महाराष्ट्र स्वराज पक्षाचे संस्थापक छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सचिव धनंजय जाधव व पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विजय झरे देखील उपस्थित होते.
या प्रकाशन कार्यक्रमात प्रकाश जाधव, ब्रह्मानंद जाधव, शरद थोरात, नाना खरात आदी मान्यवर उपस्थित होते.
उमेदवार मारुती भापकर यांनी त्यांच्या कार्य अहवालात पिंपरी चिंचवड आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील विकासाची दिशा आणि लोककल्याणकारी योजनांची माहिती दिली. याशिवाय, गॅरेंटी पत्राद्वारे त्यांनी आपल्या आगामी कार्याची वचनबद्धता दर्शवली.
Reviewed by ANN news network
on
११/०७/२०२४ ०३:४६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: