वाकड : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांना रिपब्लिकन जनशक्ती पक्षाने (डांगळे गट) जाहीर पाठिंबा दिला आहे. कलाटे यांनी नगरसेवक म्हणून केलेल्या विकासकामांची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला.
वाकड येथील प्रचार शुभारंभ सभेत पक्षाध्यक्ष अर्जुनराव डांगळे व प्रदेशाध्यक्ष शैलेंद्र मोरे यांच्या आदेशानुसार शहराध्यक्ष माऊली उर्फ किसन भोसले यांनी पाठिंब्याचे पत्र दिले.
"रिपब्लिकन जनशक्ती गेली बारा वर्षे शिवसेना (उबाठा) सोबत युतीत असून महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. कलाटे यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर उत्तम काम केले आहे," असे भोसले म्हणाले.
कलाटे म्हणाले, "सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन त्यांच्या प्रगतीसाठी मी कायम योगदान देत आलो आहे. रिपब्लिकन जनशक्तीने टाकलेला विश्वास मी सार्थ ठरवीन."
कार्यक्रमास पक्षाचे राज्य उपाध्यक्ष संग्राम रोहोम, महिला संघटिका गायत्री भोसले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
११/०७/२०२४ ०४:०६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: