चिंचवड विधानसभेत महाविकास आघाडीचे राहुल कलाटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
चिंचवड (प्रतिनिधी): चिंचवड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरद पवार गटाचे उमेदवार म्हणून श्री. राहुल कलाटे यांनी आज (दि. २९ ऑक्टोबर २०२४) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीच्या वतीने त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
कलाटे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमास मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते. सकाळी १०:०० वाजता वाकड येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. चिंचवडच्या विकासासाठी राबणाऱ्या नेत्याला पाठिंबा देण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
"गेली अनेक वर्षे चिंचवडच्या विकासासाठी राबणारा नेता" अशी ओळख असलेल्या कलाटे यांनी आपल्या भाषणात विकासाचा नवा आराखडा मांडला.कलाटे यांनी मतदारसंघातील विविध समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे आश्वासन दिले. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, महाविकास आघाडीचे प्रतिनिधी आणि स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
१०/२९/२०२४ १२:३९:०० PM
Rating:

.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: