पर्वती विधानसभा मतदारसंघात माधुरी मिसाळ यांचे दमदार शक्तिप्रदर्शन

 


मोठ्या जनसमर्थनासह माधुरी मिसाळ यांची चौथ्यांदा रिंगणात प्रवेश

पुणे (विशेष प्रतिनिधी): पर्वती विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी आज भव्य शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सारसबाग येथील गणपती आणि महालक्ष्मीच्या दर्शनाने त्यांच्या पदयात्रेला सुरुवात झाली.

मिसाळ यांनी पदयात्रेदरम्यान विविध महापुरुषांच्या स्मारकांना अभिवादन केले. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मार्केट यार्ड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पद्मावती, अण्णा भाऊ साठे स्मारक, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, बाळासाहेब ठाकरे स्मारक आणि अहिल्यादेवी होळकर स्मारक यांचा समावेश होता.

केंद्रीय सहकार आणि हवाई उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते या कार्यक्रमास उपस्थित होते. प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, माजी खासदार प्रदीप रावत, निवडणूक प्रमुख दीपक मिसाळ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली.

मिसाळ यांनी निवडणूक निर्णय अधिकारी मनोज खैरनार यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला.

या यंतर उपस्थितांना संबोधित करताना मोहोळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासकामांचा आढावा घेतला.

"सलग चौथ्यांदा भाजपने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञ असून, गेल्या पंधरा वर्षांत केलेल्या विकासकामांच्या जोरावर मोठ्या बहुमताने विजय मिळेल," असा विश्वास माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केला. त्यांनी मतदारसंघातील विकासकामे आणि विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावाही घेतला.

पर्वती विधानसभा मतदारसंघात माधुरी मिसाळ यांचे दमदार शक्तिप्रदर्शन पर्वती विधानसभा मतदारसंघात माधुरी मिसाळ यांचे दमदार शक्तिप्रदर्शन Reviewed by ANN news network on १०/२९/२०२४ १२:५६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".