नवी मुंबई विमानतळ परिसरातील अनधिकृत दर्ग्यावर कारवाई करणार - सिडको

 


एका दशकात दगडांपासून एकर भूखंडापर्यंत वाढला अनधिकृत दर्गा

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील सिडकोच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे उभारलेल्या दर्गा आणि अन्य अनधिकृत बांधकामांवर नियमानुसार कारवाई करण्याचे आश्वासन सिडको प्रशासनाने दिले आहे. हिंदु जनजागृती समितीने केलेल्या पाठपुराव्यानंतर ही कारवाई होणार आहे.

समितीचे मुंबई जिल्हा समन्वयक बळवंत पाठक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी तथा पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांची भेट घेऊन या विषयी निवेदन दिले. श्री. महेश लाड आणि पत्रकार विजय भोर यावेळी उपस्थित होते.

२०१२ मध्ये केवळ चार रंगीत दगडांपासून सुरू झालेले हे अतिक्रमण आता एक एकर क्षेत्रात पसरले असून, त्यात कंपाऊंड, कारंजे, घुमट, पाण्याच्या टाक्या, आऊटहाऊस, गेस्ट हाऊस आणि पार्किंगचा समावेश आहे. विमानतळाच्या सन्निधतेमुळे हे बांधकाम राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक ठरू शकते.

या आधी अनेक संघटनांनी पोलीस आणि सिडकोकडे तक्रारी करूनही कारवाई झाली नव्हती. सिडकोने नोटीस बजावूनही प्रत्यक्ष कृती झाली नसल्याचे समितीने निदर्शनास आणून दिले. प्रशासन कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव अशा प्रकरणांत निष्क्रिय राहत असल्याचाही आरोप करण्यात आला.

हिंदु जनजागृती समितीने सिडकोच्या आश्वासनाचे स्वागत करत लवकरात लवकर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे, जेणेकरून विमानतळ परिसराची सुरक्षा अबाधित राहील.

नवी मुंबई विमानतळ परिसरातील अनधिकृत दर्ग्यावर कारवाई करणार - सिडको नवी मुंबई विमानतळ परिसरातील अनधिकृत दर्ग्यावर कारवाई करणार - सिडको Reviewed by ANN news network on १०/२९/२०२४ १२:२५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".