थेरगावमध्ये महायुतीची एकजूट; शंकर जगताप यांच्या प्रचारासाठी भव्य पदयात्रा
चिंचवड (प्रतिनिधी) : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचाराचा आज थेरगाव येथील श्री गणेश मंदिरात नारळ फोडून शुभारंभ झाला. गणेश नगर येथील गणरायाच्या चरणी नारळ वाढवून आणि महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीतून भव्य पदयात्रा काढण्यात आली.
यावेळी माजी उपमहापौर झामाताई बारणे, प्रचारप्रमुख काळूराम बारणे, माजी नगरसेवक सिद्धेश्वर बारणे, माजी नगरसेवक संतोष बारणे, शिवसेनेचे युवा सेना सचिव विश्वजित बारणे, माजी नगरसेवक गोरक्षनाथ पाषाणकर, आरपीआय पक्षाचे शहराध्यक्ष कुणाल व्हावळकर, भारत केसरी पै. विजय गावडे, बबलू सोनकर, अभिषेक बारणे, राकेश बारणे आणि दिगंबर गुजर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोमवारी (दि. २८ ऑक्टोबर) शक्तिप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर, लगेचच आज थेरगाव येथे प्रचाराची सुरुवात करण्यात आली. या भव्य पदयात्रेत लोकमान्य कॉलनी, दुर्गा कॉलनी, गणपती मंदिर रोड, बुद्ध विहार, शिव कॉलनी, मंगल नगर, प्रेरणा शाळा रोड, गुजर नगर, संतोष नगर, जयभवानी नगर, गणेश कॉलनी, शिवदर्शन कॉलनी, तुळजाई कॉलनी, आनंदवन सोसायटी, अभिजित पार्क, रॉयल कोर्ट आणि अन्य अनेक परिसरांमधून पदयात्रा काढण्यात आली. जगताप यांनी प्रत्येक ठिकाणी नागरिकांचे अभिवादन करून विजयासाठी आशीर्वाद घेतले.
थेरगावमधील नागरिकांनी ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत जगताप यांचे स्वागत केले. महिला कार्यकर्त्यांनी जागोजागी औक्षण करून पाठिंबा दर्शविला. पदयात्रेदरम्यान जगताप यांनी तक्षशिला बौद्ध विहार आणि विविध धार्मिक स्थळांना भेट देऊन नागरिकांचे आभार मानले.
महायुतीच्या उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारात थेरगावमधील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला, ज्यामुळे प्रचाराच्या पहिल्याच दिवशी महायुतीची एकजूट आणि जनतेचा पाठिंबा स्पष्ट दिसून आला.
Reviewed by ANN news network
on
१०/२९/२०२४ ०५:५५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: