पिंपरी मतदारसंघात निवडणुकीच्या पारदर्शकतेसाठी मन्वेशसिंग सिध्दू यांची नेमणूक
पिंपरी : २०६ पिंपरी (अ.जा) विधानसभा मतदारसंघातील आगामी निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक जनरल निरीक्षक म्हणून मन्वेशसिंग सिध्दू (भारतीय प्रशासन सेवा) यांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी दिली आहे.
नियुक्त सामान्य निरीक्षक मन्वेशसिंग सिध्दू यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस, क्वीन्सगार्डन रोड, ट्राफिक पोलीस चौक, पुणे असा आहे. त्यांच्याशी संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९२७००५१२०६ आणि दूरध्वनी क्रमांक ०२०-२९५१४८८६ दिला आहे. तसेच निवडणूक निरीक्षकांचे संपर्क अधिकारी मुकुंद पवार यांचा संपर्क क्रमांक ८००७२००५८५ असा आहे.
पिंपरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना जनरल निरीक्षकांना भेटण्यासाठी व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस, पुणे येथे सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंतची वेळ निश्चित करण्यात आली आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन पिंपरी (अ.जा) विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
आज मन्वेशसिंग सिध्दू यांनी पिंपरी (अ.जा) विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी कार्यालयातील नामनिर्देशन स्वीकारण्याच्या प्रक्रियेचे निरीक्षण केले आणि निवडणूक प्रक्रियेच्या सुसूत्रता व पारदर्शकतेची पाहणी केली.
Reviewed by ANN news network
on
१०/२९/२०२४ ०५:५०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: