पिंपरी मतदारसंघात अंतिम दिवशी ३३ अर्ज दाखल; निवडणुकीची रंगत वाढली

 


पिंपरी  मतदारसंघात ३९ उमेदवारांकडून एकूण ४५ अर्ज दाखल

पिंपरी (प्रतिनिधी) : पिंपरी (अ.जा) विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी ३३ नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले. आज अखेर एकूण ३९ उमेदवारांनी ४५ नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी दिली आहे. 

अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये बहुजन समाज पार्टीचे सुंदर म्हसुकांत कांबळे, अपक्ष उमेदवार दिपक सौदागर रोकडे, स्वप्नील दादाराव कांबळे, मनोज भास्कर गरबडे (वंचित बहुजन आघाडी - २ अर्ज), राष्ट्रीय बाल्मिकी सेना पार्टीचे राजेंद्र मानसिंह छाजछिडक, तसेच विविध पक्षांचे उमेदवार व अपक्षांचा समावेश आहे. 

आजच्या दिवशी ३ व्यक्तींनी ६ नामनिर्देशन अर्ज विकत घेतले असून, एकूण ९९ उमेदवारांनी १८९ अर्ज विकत घेतले आहेत. अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी मतदारसंघात उमेदवारीसाठी मोठा प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. 

अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये नामवंत नेते, युवा कार्यकर्ते आणि विविध समाजघटकांचे प्रतिनिधित्व करणारे उमेदवार आहेत. आता निवडणुकीची स्पर्धा अधिक रंगतदार होणार आहे.

रात्री १० वाजण्याच्या सुमारास निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पाठविलेल्या दुरुस्ती प्रेसनोट नुसार .......

पिंपरी मतदारसंघात ४५ उमेदवारांचा निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्धार

पिंपरी (प्रतिनिधी) :  पिंपरी (अनुसूचित जाती) विधानसभा मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीसाठी आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अंतिम दिवशी ३३ नवीन अर्ज दाखल झाले. निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण ३९ उमेदवारांनी ४५ नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत.

दिवसभरात बहुजन समाज पार्टी, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), वंचित बहुजन आघाडी यांसह अनेक राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे दाखल केली. यामध्ये लक्षणीय बाब म्हणजे २० हून अधिक अपक्ष उमेदवारांनीही निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी दर्शवली आहे.

आजच्या दिवशी तीन व्यक्तींनी सहा नवीन नामनिर्देशन पत्रे खरेदी केली. निवडणूक प्रक्रियेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत ९९ संभाव्य उमेदवारांनी एकूण १८९ नामनिर्देशन पत्रे विकत घेतली आहेत. 

प्रमुख उमेदवारांमध्ये सुंदर म्हसुकांत कांबळे (बहुजन समाज पार्टी), सुलक्षणा राजू धर (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार), मनोज भास्कर गरबडे (वंचित बहुजन आघाडी) यांचा समावेश आहे. तसेच विविध छोट्या पक्षांचे प्रतिनिधी आणि स्वतंत्र उमेदवारांनीही आपली उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यांची नावे अशी, सुंदर म्हसुकांत कांबळेबहुजन समाज पार्टीदिपक सौदागर रोकडे-अपक्ष स्वप्नील दादाराव कांबळे  अपक्ष मनोज भास्कर गरबडे  वंचित बहुजन आघाडी   अर्जराजेंद्र मानसिंह छाजछिडक - राष्ट्रीय बाल्मिकी सेना पार्टी, ॲड.गौतम सुखदेव चाबुकस्वार अपक्षनवनाथ चंद्रकांत शिंदेसमता पार्टीभिकाराम किसन कांबळे- अर्जमनोज विष्णू कांबळे  अपक्ष, राहुल मल्हारी सोनावणे  विद्यूतलै चिरूतैगल कच्ची(VCK) , ॲड गौतम प्रल्हाद कुडुकअपक्ष, सुलक्षणा राजू धर  नॅशनॅलीस्ट काँग्रेस शरदचंद्र पवार,सुरेश हरिभाऊ भिसे-अपक्ष, ॲड सुधीर हिंदुराव कांबळे  अपक्ष, मीनल यादव खिलारे-अपक्ष, प्रल्हाद रामभाऊ कांबळे – अपक्ष, हेंमत अर्जुन मोरे अपक्ष, काळुराम मारूती पवार अपक्षकृष्णा प्रल्हाद कुडुक अपक्ष जफर खुर्शीद चौधरी  अपक्ष, बाळासाहेब नामदेव ओव्हाळ - महाराष्ट्र स्वराज्य पक्ष, मयुर भरत जाधव - अपक्षबाबा बाळु कांबळे- ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, जितेंद्र बाबासाहेब ननावरे  अपक्ष, मुकंदा आनंदा ओव्हाळ अपक्ष, नरसिंग ईश्वरराव कटके-अपक्ष कैलास नारायण खुडे अपक्ष लक्ष्मण(दादाआत्माराम शिरोळे - अपक्ष, कैलास गहिनीनाथ बनसोडेअ क्ष रिता प्रकाश सोनवणेअपक्षआज ३० उमेदवारांनी ३३  अर्ज दाखल केले असून एकूण ३९ उमेदवारांनी ४५ अर्ज दाखल केले आहेत..

छाननी नंतर वैध उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी स्पष्ट केले.

पिंपरी मतदारसंघात अंतिम दिवशी ३३ अर्ज दाखल; निवडणुकीची रंगत वाढली पिंपरी मतदारसंघात अंतिम दिवशी ३३ अर्ज दाखल; निवडणुकीची रंगत वाढली Reviewed by ANN news network on १०/२९/२०२४ ०८:०७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".