भोसरी : भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार महेश लांडगे यांनी आज शक्तिप्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
सकाळी ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज व इतर प्रमुख मंदिरांचे दर्शन घेतल्यानंतर बापुजी बुआ चौकापासून भव्य पदयात्रेला सुरुवात झाली. पीएमटी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून संत तुकाराम मंगल कार्यालयात पदयात्रेची सांगता झाली.
उमेदवारी अर्ज दाखल करताना माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, मंगला कदम यांच्यासह महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते.
भोसरीत महेश लांडगेंचा उमेदवारी अर्ज दाखल; सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती
Reviewed by ANN news network
on
१०/२९/२०२४ ०८:१६:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
१०/२९/२०२४ ०८:१६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: