अखनूर : जम्मू-काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये सोमवारी (२८ ऑक्टोबर) भारतीय लष्कराच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. सोमवारी सुरू झालेली ही २७ तासांची मोहीम मंगळवारी सकाळी यशस्वीपणे पूर्ण झाली.
सामना सोमवारी त्या वेळी सुरू झाला, जेव्हा दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेजवळ (LoC) लष्कराच्या ताफ्यातील एका रुग्णवाहिकेवर हल्ला केला. त्या दिवशी संध्याकाळपर्यंत एक दहशतवादी ठार झाला होता, तर उर्वरित दोघांचा मंगळवारी सकाळी जोगवान गावातील अस्सान मंदिराजवळ झालेल्या अंतिम हल्ल्यात खात्मा झाला. शांततेने गेलेल्या रात्रीनंतर, सकाळी सात वाजता लष्कर व पोलिसांनी जोरदार हल्ला सुरू केला आणि दोन तासांत उर्वित दोन्ही दहशतवाद्यांचा अंत झाला.
या मोहिमेत BMP-II इन्फंट्री वाहनं, विशेष दल, नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) कमांडो, तसेच हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या सहाय्याने हवाई सहकार्य दिले गेले. या मोहिमेत फँटम, भारतीय लष्कराचा चार वर्षांचा बेल्जियन मलिनोइस श्वान, वीरगतीला प्राप्त झाला. शत्रूचे लक्ष विचलित करून त्याने वीरता दाखवून आपल्या प्राणांची आहुती दिली.
“फँटमच्या बलिदानास आम्ही सलाम करतो. आमचे लष्करी दल दहशतवाद्यांपर्यंत पोहोचत असताना फँटमने शत्रूचे लक्ष स्वतःवर घेतले आणि त्यात त्याने प्राण गमावले. त्याचे साहस, निष्ठा आणि समर्पण कधीही विसरले जाणार नाही,” असे लष्कराने त्यांच्या ‘X’ हँडलवर म्हटले आहे.
"रात्रभर चाललेल्या कडेकोट सुरक्षेनंतर आज सकाळी जोरदार चकमक झाली आणि आमच्या दलांनी मोठा विजय मिळवला. सततच्या प्रयत्नांनी आणि उत्तम तंत्राने तीनही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे," असे लष्कराने सांगितले.
या मोहिमेत युद्धसामग्री देखील हस्तगत करण्यात आली आहे, ज्यामुळे या क्षेत्रातील सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत होईल.
#Hero#K9Warriors
— PRO Defence Jammu (@prodefencejammu) October 28, 2024
Salute & respect to #Phantom, the #IndianArmyDog who made the Supreme Sacrifice while taking part in the counter-terrorism operation in Jammu & Kashmir today. His courage, loyalty,& dedication will never be forgotten. @SpokespersonMoD@Whiteknight_IA @diprjk pic.twitter.com/mhG6Mw3gha
Reviewed by ANN news network
on
१०/२९/२०२४ ०४:११:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: