विचुंबे गावात गळफास घेतलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह

 


पनवेल :  विचुंबे गावातील रेल्वेपटयाजवळ असलेल्या झाडाला एका सव्वीस वर्षीय तरुणाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. त्याच्या जवळ असलेल्या आधार कार्डवरुन त्याचे नाव श्याम तुळश्या वाघे (रा. ठि. शिपाई चाळ, डम्पींग रोड, नॅशनल स्कूलजवळ,द‍िवा जि. ठाणे ) येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे.

रेल्वे पटयाजवळील झाडाला एक इसम पांढ-या साडीच्या तुकडयाने गळफास घेतलेल्या अवस्थेत असल्याची माहिती  खांदेश्वर पोलिसांना २७ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता मिळाली होती. त्यानुसार घटनास्थळी खांदेश्वर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक बळवंत पाटील यांनी भेट दिली. पाहणीअंती श्याम या तरुणाचा मृतदेह असल्याचे कळले. घटनास्थळी त्याच्या जवळ असलेल्या आधारकार्डवरुन त्याची ओळख पटली आहे. याच ठिकाणी पोलिसांनी पांढ-या साडीवर हिरव्या रंगाची फुले असलेल्या साडीचा तुकडा तसेच गुंडाळलेल्या स्थितीत त्याच रंगाचा साडीचा तुकडा जप्त केला आहे. ७२ सेंटीमीटरच्या या तुकडयास दोन्ही बाजुंनी एक एक गाठ असलेला काळसर रंगाने माखलेला किंसूही मिळून आला आहे. पोलिस शिपाई रविंद्र बाबूराव गिते यांनी खांदेश्वर पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीवरुन प्रथमदर्शी अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. पोलिस उपनिरिक्षक दत्ताञेय वणे पुढील तपास करत आहेत. 

सदर मृतदेह बेवारस अवस्थेत आढळून आला आहे. मयत इसमाबाबत किंवा त्याचे नातेवाईकांबाबत कुणाला काही माहिती असल्यास खांदेश्वर पोलिस ठाण्यात कळवावे असे आवाहन नवी मुंबई खांदेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक दत्ताञेय वणे यांनी केले आहे.

विचुंबे गावात गळफास घेतलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह विचुंबे गावात गळफास घेतलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह Reviewed by ANN news network on ९/०१/२०२४ ०८:४०:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".