पनवेल : रिक्षात प्रवासी महिला महागडा मोबाइल विसरली मात्र प्रामाणिक रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे तिला तो मोबाइल परत मिळाला आणि तिने या रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. याची दखल घेत पत्रकार मित्र असोसिएशनच्या कार्यालयात रिक्षाचालक अशोक धनवट यांचा सत्कार करण्यात आला.
तीन दिवसांपूर्वी रिक्षाचालक अशोक धनवट हे नेहमीप्रमाणे कळंबोली स्टॉपवर थांबले असता ओरियन मॉलजवळ जाण्यासाठी एक महिला त्यांच्या रिक्षात बसली. मॉलजवळ आल्यानंतर तिने ठरलेले भाडे त्यांना दिले मात्र आपला महागडया कंपनीचा मोबाइल विसरली. त्यांना सोडल्यानंतर रिक्षाचालक धनवट हे आपल्या पुढच्या कामाला लागले. पण मध्येच फोनचा आवाज आल्याने त्यांनी तो फोन उचलला आणि मोबाइल रिक्षातच विसरल्याची माहिती दिली. संबंधित महिलेला पत्ता विचारत त्याच जागेवर त्यांनी मोबाइल त्यांच्या ताब्यात दिला. आज मोबाइल हरवला असता तर मोठे नुकसान झाले असते परंतु तुमच्यासारखे प्रामाणिक रिक्षाचालक असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळतो अशी कृतज्ञता त्या महिलेने व्यक्त केली होती. त्यांच्या कार्याची माहिती पत्रकार मित्र असोसिएशनला कळल्यानंतर शनिवारी कार्यालयात बोलावून संस्थापक केवल महाडीक यांच्याहस्ते रिक्षाचालक अशोक धनवट यांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देउन गौरविण्यात आले.

यावेळी असोसिएशनचे संतोष आमले यांनी असोसिएशनतर्फे त्यांचे स्वागत करताना अशा रिक्षाचालकांमुळे समाजात नवा आदर्श निर्माण होत आहे. त्याची दखल घेउन वेळोवेळी असे गौरव समारंभ आयोजिले जातात. इतर रिक्षाचालकांना त्यातून प्रेरणा मिळते असे सांगितले. कार्याध्यक्ष सचिन जोशी यांनी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या प्रामाणिक लोकांची आम्ही नेहमीच दखल घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो असे सांगितले.
१९ ऑगस्टला सोमनाथ धोत्रे नामक रिक्षाचालकाला त्यांच्या प्रामाणिकपणाबददल गौरविण्यात आले होते. यानंतरही जर कोणाकडून समाजोपयोगी कार्य घडत असेल तर त्याची नक्कीच दखल घेतली जाईल अशी भूमिका मान्यवरांनी व्यक्त केली.
यावेळी असोसिएशनचे संस्थापक केवल महाडीक, उपाध्यक्ष सुनिल भोईर, कार्याध्यक्ष नितीन जोशी, सहसचिव शशिकांत दळवी, दैनिक युवक आधारचे संपादक संतोष आमले, कार्यकारी संपादक सुरेश भोईर, कार्याध्यक्ष सचिन जोशी, रिक्षाचालक विजय घनवट, सुभाष खेडकर, सतेश खिलकर उपस्थित होते.
प्रामाणिक रिक्षाचालकाचा पत्रकार मित्र असोसिएशनतर्फे सत्कार
Reviewed by ANN news network
on
९/०१/२०२४ ०८:३५:०० AM
Rating:
Reviewed by ANN news network
on
९/०१/२०२४ ०८:३५:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: