उरण: कामगार नेते महेंद्र घरत यांनी सिडकोचे सुप्रिटेंडेंट इंजिनीयर आणि अधिकारी यांच्या समवेत उलवे नोडमधील रस्त्यांची पाहणी केली. गणपती सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना, सर्वसामान्य नागरिकांना खराब रस्त्यांमुळे जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी, अशी मागणी घरत यांनी सिडकोचे अधिकारी आणि सुप्रिटेंड इंजिनीयर यांच्याकडे केली.
यावर सिडको अधिकारी आणि सुप्रिटेंडेंट इंजिनिअर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, लवकरच युद्ध पातळीवर खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले जाईल, असे आश्वासन घरत यांना दिले.
उलवे नोडमधील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी; महेंद्र घरत यांची मागणी
Reviewed by ANN news network
on
९/०६/२०२४ ०८:०५:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: